उप अभियंता पाटील यांनी स्विकारला पाटबंधारे सिंचन उप विभाग क्र 3 चा अतिरिक्त कार्यभार
लातूर (प्रतिनिधी) : पाटबंधारे सिंचन उप विभाग क्र 3 येथील उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार अभियंता नितिन पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रशासकीय कामांसोबतच लातूर शहरातील सिंचन भवन व शासकीय वसाहतीचे सुशोभिकरण व नाविन्यकरण करण्याच्या कामांना गती देणार असल्याचे मत उप अभियंता नितिन पाटील यांनी व्यक्त केले. पदभार स्वीकारल्या नंतर कार्याल्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी उप अभियंता नितिन पाटील यांचे पुष्प देवून अभिनंदन करण्यात आले.
उप अभियंता एस.जी. कोन्गे यांच्या सेवानिवृतीमुळे रिक्त झालेल्या या उपविभागाचा अतिरिक्त पदभार नितीन बी. पाटील यांच्याकडे देण्याबाबत आदेश मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक औरंगाबाद यांनी दिले आहेत. उप विभागाचा पदभार स्विकारल्या नंतर नितिन पाटील यांनी सांगीतले की, उप विभागा अंतर्गत असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पांची सिंचन व व्यवस्थापणाची सर्व कामे, तेरणा नदीवरील लातूर पध्दतीची बंधारे व त्यावरील पूरनियत्रंण कामे तसेच सर्वात मह्त्वाचे व मागील अनेक वर्षांपासुनची शेतकऱ्यांची मागणी असलेला व राज्यात प्रथमच पथदर्शी ठरणारा तावरजा प्रकल्पाचा जुन्या सांडव्यावर उभे उचल द्वारे बसवून त्याचे सर्व प्रकारचे नुतनीकरण करण्याबाबतीतचा नाविन्य पुर्ण असा प्रस्ताव व काम प्रशासकिय मान्येते साठी या उपविभागाकडे असुन, लवकरच मंजूर होणार आहे. यासोबतच लातूर शहरातील सिंचन भवन व शासकीय वसाहतीचे सुशोभिकरण व नाविन्यकरण करण्याचे प्रस्तावित असुन या कामांना गती देण्याचा मानस उप अभियंता नितिन पाटील यांनी व्यक्त केला.
उप अभियंता नितीन पाटील यांनी पाटबंधारे सिंचन उप विभाग क्र. 3 चा अतिरिक्त कार्यभार स्विकारल्याबद्दल कार्याल्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सी.जे. शेख, के.आर. येणगे, एस.डी. पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील आदींची उपस्थिती होती.
