महादेव नगर येथील दोन मुलींनी एकाच साडी ने घेतला गळफास
रात्री उशीरा मुलींच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
लातूर मधील ह्दय पिळून टाकणारी धक्कादायक घटना
लातूर:-सतरा अठरा वर्षे वय असलेल्या दोघा मुलींनी आधी घर सोडले पोलीसांनी नंतर पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले जबाबही नोंदले आता सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा असतानाच दोघा बहिणींनी दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत एका साडीने गळफास घेत शनिवारी तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपले आयुष्य संपले हि ह्दय पिळुन टाकणारी ही घटना आहे लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ शिवारातील विश्वकर्मा कॉलनीतील ,यासंदर्भात हरंगुळ बुद्रुक ग्रामपंचायतीचा सदस्य पंकज उत्तम सुतार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रात्री उशीरा दाखल करण्यात आला .
याप्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार ,बार्शी रोडवरील इंजिनियरिंग कॉलेजच्या मागील बाजूस मंदिराशेजारी महादेव नगर येथील हरंगुळ बुद्रुक गावच्या हदीत वास्तव्यास असलेल्या साडे सतरा वर्षाची मुलगी अआपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती काही दिवसांपूर्वी तिची मावस बहीण आपल्या बहिणीच्या घरी वास्तव्यास आली होती साधारण आठ दिवसापूर्वी त्या दोघी अचानक बेपत्ता झाल्या.त्यांचा घेतल्यानंतरही त्या कुठेही मिळून आल्या नाही तिच्या वडिलांनी एमायडिसी पोलीस स्टेशन मध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली, त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तपासाअंती या दोन्ही मुली पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .आणि पोलिसांनी त्या दोघींना घरी आणण्यात आले. यासंदर्भात पोलिसांनी त्या दोघींचाही जबाब नोंद दिला असता आपण स्वतःहून घर सोडून गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्या दोघींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले परंतु त्या दोघींनी तपासणी करण्यास नकार दिला दिनांक 3 जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दोघेही कुटुंबीयांसोबत राहत्या घरी मुलींचा शनिवारी उपास असतो म्हणून त्यांच्या आईने त्यांना उपवासाचा नाश्ता करण्यास सुरुवात केली ,याच वेळी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोघी छतावर गेल्या दुसऱ्या मजल्यावर दोन पत्र्याच्या खोल्या असून तेथे कोणीच राहत नाही याची संधी सांगून या त्याच्या लोखंडी रोडला एकाच साडीने गळफास घेतला.हि ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली, साधारण अर्ध्या तासानंतर मुलीचा खोलीतून काहीच आवाज येत नसल्याने दरवाजा तोडला असता हा प्रकार सर्वांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव मिरकले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आणि नंतर पंकज सुतार यांच्या विरुद्ध फूस लावून पळवून नेवून, जीवे मारण्याची धमकी देणे आणि आत्महत्याच प्रवृत्त करणे या कलमाद्वारे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एम आय डी सी पोलिस करित आहेत.
भाजप प्रदेश महिलामोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष यांनी आरोपीला अटक करण्याची केली मागणी
भाजपा महिला मोर्चांच्या पदाधिकारी आणि नातेवाईकांनी एम आय डी सी पोलिस स्टेशन समोर घटनेच्यादिवशी आरोपी वर गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली



