Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

"लगेगी आग तो कही मकान जद मे होंगे"" "सिर्फ हमारा मकान थोडी है?"

 लगेगी आग तो कही मकानं जद मे होंगे,,,,,,,,,,,,!




भारतीय राजकारणात सांस्कृतिक क्रांती करू पाहणाऱ्या पुरोगामी विचारवंतांचे टोळके सक्रिय असते आणि संसदीय राजकारणात त्यांचा सांस्कृतिक क्रांती चां सुधारणावादी कार्यक्रम चालू असतो , त्यांच्या धर्म चिकित्सा चालू असतात  आणि दुसऱ्या बाजूने त्या अल्पसंख्यांक धार्मिक सुधारणा वादाबद्दल बोलत ही नाहीत आणि लिहीत ही नाहीत , 

पौराणिक कालखंडा पासून त्यांची चिकित्सा सुरू होते आणि त्याचा आदी , मध्य, व अंत फक्त ब्राह्मण समाज हा शोषक आहे या निष्कर्षावर अंतर्धान पावतो, 

हे ही खरे आहे की देशातील हिंदू धर्म व्यवस्थेत चार वर्ण होते व त्यातील ब्राह्मण हा पुरोहित वर्ग होता , सामाजिक मान्यतेने तो वरच्या दर्जाचा होता  पण हे ही खरे आहे की राज्य कारभार आणि दंड शक्ती असलेला वर्ग क्षत्रिय समाज होता व तोच त्याचे क्षेत्रातील जमीन व साधनं संपत्ती चां सर्वेसर्वा ही होता•

भारतीय वर्ण व्यवस्था जाती बद्ध झाली आणि हळू हळू ती अनुलोम , प्रतीलोम विवाह किंवा वर्ण संकर , व त्या नंतर जाती संकर  याने हजारो जातीत विभाजित झाली,

ब्राह्मण, क्षत्रिय जाती समूह जसे की राजपूत , मराठा आदी, तसेच गाव गाड्या तील अति शूद्र जाती , जसे मांग , महार इत्यादी व छोट्या कारागीर जाती चां समूह जसे लोहार , सुतार,  कुंभार , तेली , माळी इत्यादी  इतर मागास वर्गीय( जे जात मागास नाहीत परंतु सामाजिक व आर्थिक दृष्ट्या फार पुढारलेले ही नाहीत)

 देशाला स्वातंत्र्य मिळाले, हे खरे आहे , परंतु हे स्वातंत्र्य कोणत्याही राजकीय क्रांती तून आले नाही , जसे की कम्युनिस्ट क्रांती, •

त्या मुळे प्रचंड उलथापालथ भारतीय समाजात न होता , किंवा क्रांतिकारी बदल न होता आहे ती सामाजिक व आर्थिक व्यवस्था तशीच ठेऊन, फक्त ब्रिटिश या देशातून निघून गेले•

सामाजिक स्थिती नुसार गाव पातळीवर ग्रामपंचायत हाताळणारा अधिकारी पाटील होता तर शेतसारा याचा हिशोब लीहणारा कुलकर्णी होता, 

तत्कालीन काँग्रेस मधे वरिष्ठ पातळीवर पक्षीय नेतृत्व करणारा वर्ग ब्राह्मण होता तर राज्य ते अगदी गाव पातळीवर थेट सत्ता राबवणारे क्षत्रिय होते•

हळू हळू क्षत्रिय लोकांच्या हातात व्यापक शक्ती सरकार चे प्रमुख म्हणून एकवट त गेली•

 सत्तेच्या  वर्तुळातून ब्राह्मण बाहेर फेकला गेला •

या सत्तेच्या वर्तुळात शूद्र अतिशूद्र हे व्यापक प्रमाणात कधी शिरू शकले नाहीत , तर जागृती अभावी व हजारो जाती विभाजित ओबीसी हा राजकीय दृष्ट्या कुमकुवत च राहिला •

ओबीसी म्हणून, किंवा एस सी , एस टी, , व्हीजे एन टी,वर्ग म्हणून  आज ही ते फारसे एकत्रित नाहीत•

शैक्षणिक दृष्ट्या पुढारल्याने ब्राह्मण समाज अंतर्गत पोटजाती त्यागून ब्राह्मण महासंघ म्हणून एकवटला, तसाच समान हित संबंधातून मराठा समाज ही एकवटला , हे एकत्रीकरण  प्रत्येक समाजात होत असते•

सांस्कृतिक क्रांती करू पाहणारा प्रत्येक अभ्यासक हिंदू इतिहास अभ्यासताना त्या धर्मातील धर्म ग्रंथाची चिकित्सा करतो , आणि त्यातील आधार शोधून त्या आधारे ब्राह्मण समाजाने कसे शोषण केले याचे पाढे वाचत राहतो व हे चक्र नियमित चालत राहते•

इतिहासात घुसून आपण एकलव्याला अंगठा देऊ शकत नाही,त्याच प्रमाणे द्रोणाचार्यां ना शिक्षा देऊ शकत नाही,•

या धार्मिक चिकित्सा याने आपण  ब्राह्मण समाजाचा सामाजिक दर्जा खाली आणू शकत  नाही , 

तरीही या धार्मिक चिकित्सा केल्या जातात याचे कारण "ब्राह्मण"समाजाला  निरंतर खलनायकाच्या  चौकटीत बसवून मताचे ध्रुवीकरण घडवून आणत ,

""ब्राह्मण ~ब्राह्मणेतर  वाद जिवंत ठेऊन आजच्या सत्ता धाऱ्याना आपल्या बाजूने जनमत खेचायचे असते•

मला अनेक लोक भेटतात आणि ते मला विचारतात की ब्राह्मण वर्ग राजकारणात धर्माचा आधार घेतात•

त्यांच्या म्हणण्यात तथ्य जरूर आहे ,  आणि त्याचे कारण ही तितकेच सबळ आहे, आपल्या हाती असलेल्या पूंजी  चे आधारेच व्यक्ती किंवा समाज लढाई लढत असतो , ब्राह्मण समाजाचे हातात धर्म व्यवस्था चे अधिकार आहेत व ते समाज मान्य अधिकार आहेत, •

जगातील कोणताही जनसमुदाय धर्म भावना , आणि श्रद्धा मुक्त नाही व ती एक शक्ती आहे जी व्यवहारात दिसत नाही परंतु तिचे अस्तित्व व व्याप्ती ही प्रचंड असते ही धर्म भावना व श्रद्धा हीच ब्राह्मण वर्गाची कवच कुंडले आहेत•

 संख्यात्मक बला आधारे ब्राह्मण वर्ग हा संख्येने साडे तीन टक्के तर उत्तर प्रदेश सारख्या विभागात तो दखलपात्र टक्के वारीत आहे  पण सरासरी मात्र काढली तर साडे तीन टक्केच देशपातळीवर येते,•

या उलट शासक जाती , मराठा , राजपूत आदी त्या त्या विभागात 25ते 30% पर्यंत असतात व त्यांचे हातात , जमीन , सहकार, बँकिंग, सह स्थानिक स्वराज्य संस्था  पासून ते विधान सभा व लोकसभा या कायदे मंडळाच्या सत्ता ताब्यात असल्याने शासन , प्रशासन यावर ही याचा वर्गाचा कब्जा आहे•

हाती असलेल्या सत्तेतून सर्वाधिक समाजाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी याच वर्गावर होती•

परंतु शासक म्हणून या वर्गाने तोंडी लावावे तसे सुधार इतर समाजाला देऊ केले त्यांचेतिल मुके बहिरे आंधळे असे प्रतिनिधी जाणीवपूर्वक निवडले आणि त्यांचे बिनविरोध पाठिंब्याने या समाजा चे विकासासाठी असलेला निधी ही पूर्णतः कधीच वापरला नाही उलट तो निधी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी इतरत्र  वळवला•

ज्यांना आम्ही शासक जात म्हणतो ती "मराठा" जाती महाराष्ट्रात मोठ्या जन संख्येची भागीदार आहे•

•किमान त्या जातीचा तरी विकास शासन कर्त्या घराण्यांनी केला आहे काय? याचे उत्तर ही नकारार्थी सापडते,  साधारणतः ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शेती हाच उपजीविकेचा धंदा असणारे 68%लोक आहेत व या टक्केवारीत मराठा समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे•

शेती व्यवस्थेवर अनिष्ट परिणाम घडवून आणलेल्या अनेक बाबीं नी आर्थिक उत्पन्न कमालीचे खालावल्याने व छोट्या कर्जाने ही आत्महत्या याच समाजातील  लोकांचे झाल्या याचे कारण  इतर समाज भूमिहीन असला तरी त्याने जगण्याच्या शर्यतीत पडेल ते काम स्विकारले जे काम करण्यात या वर्गाला त्याची सामाजिक प्रतिष्ठा आडवी आली•

ज्याला मराठीत एक म्हण आहे "आई जेवू घालेना , बाप भीक मागू देईना""

छत्रपती शिवराय हे आमच्या समाजाचे राजे होते हा इतिहासकालीन सामाजिक वारसा  प्रत्यक्ष जगण्यातील कोंडी फुटण्यातील भावनिक अडथळा ठरला , आम्ही प्रसंगी मरू परंतु सफाई काम करणार नाही हे ही या समाजाने स्विकारले•

दुसऱ्या बाजूने आपली सत्ता म्हणून या समाजाने ज्यांना आपले आदर्श लोकप्रतिनिधी मानले त्यांनी सत्तेचा वापर स्व विकास व नातेवाईक यांचा विकास या पुरता मर्यादित ठेवला•

मी छाती ठोक पने सांगतो की त्यांचे सत्तेत , त्यांचे आर्थिक वर्तुळात युगे लोटली तरी सामान्य वर्गातील एका ही समाज बांधवांचा युवकाचा समावेश कधीच होणार नाही याचे कारण आत्ता या सत्ता धारी वर्गाची विन परस्पर नाते संबंधात झालेली आहे, व त्या घराण्यातील सोयरिक करावी इतका दर्जा सामान्य व्यक्तीचा राहिलेला नाही•

राज्यातील जन्मलेल्या बालकाच्या नोंदी पासून ते के जी टू पी जे पर्यंत चे गरजांसाठी आणि त्या नंतर नौकरी साठी , शेतातील कर्ज साठी , थोडक्यात मरे पर्यंत सामान्य माणसाचे दोर याच वर्गाचे सत्ताधाऱ्यांचे हातात एकवटलेले आहेत•

 महाराष्ट्रात ई डी आली आणि तिने जी प्रकरणे बाहेर काढली त्याने डोके चक्रावून जावे इतकी प्रकरणे बाहेर काढली आहेत•

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण शोधत असताना  त्यात अजित दादा चे मामा राजेंद्र शंकरराव घाडगे यांचे प्रकरण समोर आले  त्यांच्या एकूण रजिस्टर कंपन्या 20आहेत ज्यांची नावे त्यांना ही सांगता येणार नाहीत  ज्यात ते संचालक आहेत •

त्याची नावे थोडी पाहू

जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड

कल्पवृक्ष प्लांटेशन प्रायव्हेट लिमिटेड

फायर पॉवर प्रॉपर्टीज प्राइवेट लिमिटेड

विराज वास्तू निर्माण प्रायव्हेट लिमिटेड

हायर पॉवर मार्केटिंग (इंडिया) प्रिनी टेल लिमिटेड

फायर पॉवर ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड

सिड ट्री रि यल टॉर्स प्रायव्हेट लिमिटेड

महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड

फायर पॉवर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड

वक्रतुंड प्रमोटर्स एल पी

गोयल गंगा इस्टेट अँड प्रॉपर्टीज

फायर पॉवर ॲग्री फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड

एकदन्त वास्तू निर्माण प्रायव्हेट लिमिटेड

इत्यादी सह ते 

पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मांजरी या चे उपाध्यक्ष ही आहेत ज्याच्या अध्यक्ष अजित दादा पवार आहेत तर मान्यवर संचालक शरद चंद्रजी पवार साहेब

आहेत•

माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांची ईडीने चौकशी केली असता तिची सुरुवात चार ते साडेचार कोटी च्या व्यवहारापासून सुरू झाली ज्यात ऋषिकेश देशमुख यांनी मनी लॉन्ड्रिंग करून नागपूर ते दिल्ली व दिल्ली ते पुन्हा नागपूर साई शिक्षण संस्थेस डोनेशन अशा पद्धतीने काळ्याचा पांढरा पैसा झाला•

अधिक तपास करता 12 कागदोपत्री संस्था दिसून आल्या ज्यातून 50कोटी पेक्षा अधिक रकमा फिरवल्या गेल्या आहेत•

नुकतेच उरण येथील राज्य महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या  जसुई तलाठी क्क्षेतील धुंतुम या गावातील साडे आठ एकर जमीन जीची किंमत 300कोटी रुपये होते ती रोख रक्कम गावकऱ्यांना देऊन सलील देशमुख यांनी खरेदी केली जे व्यवहार 2006ते 2015या कालावधीतील आहेत •

प्रीमियर पोस्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सलील देशमुख यांची कंपनी आहे सलील देशमुख यांचे अकाउंटंट किशोर देवानी यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे•

या डमी कंपनी स  ऋषिकेश देशमुख यांच्या कंपनीने कर्ज दिल्याचे दाखवले आहे•

इतका अफाट पैसा कोठून आला याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल•

पुण्याच्या बुधवार पेठेतील बायकांनी एकमेकीला तू पतीवर्ता आहेस काय असे विचारावे तसे शिवसेना नेते खासदार संजय राऊत या राजकारणात कोण धुतल्या तांदळासारखे आहे काय? असा प्रश्न विचारतात?

त्यांचा प्रश्न वाजवी असला तरी त्याचे उत्तर हेच आहे की राजकारणात राहून स त्तेच्या मार्गाने  अर्थकारण व अर्थकारनातून पुन्हा सत्ता प्राप्ती हा खेळ घरांण्यापुरता मर्यादित कांहीं लोकांनी केला आहे  आपले हे स्वरूप उघडे पडू नये म्हणून यातील पैसा वापरून समाजातील बुध्दी जिवी वर्गाला ते खरेदी करतात व हाच बुध्दी जीवी वर्ग समाजात वैचारिक मंथन चे नावाने सामाजिक विभाजनाचे विचार पेरत राहतात व दुसऱ्या बाजूने ह्या शोषक नायकायाना देवत्व ही बहाल करीत असतात ,•

अनेक वर्षाचे चळवळीच्या दीर्घ अनुभवातून गेलो असल्याने मला हे जाणवले की ही बौद्धिक चळवळ आमच्या सारख्याच आयुष्य फक्त त्यांचे स्वार्थासाठी वापरून घेते व ते निरंतर वापरता यावे म्हणून हे कार्यक्रम चालूच असतात व नव नवीन बळीचे बकरे बहुजनातून मिळत राहतात•

आम्ही समग्र क्रांती करू हा भ्रम च राहतो व जेव्हा आयुष्य हातातून निसटून गेलेले असते तेव्हा आपलीच शिकार झाली आहे हे ही लक्षात येते •

ही घराणे शाही हीच खरी डोके दुःखी आहे व व्यवस्थेचे सर्व फायदे याच घरण्याणी लुटलेले आहेत 

स्वतः कडे नारळ आणि समाजाच्या हातात शेंडी सोपवणाऱ्या राजकीय घराणे शाहिने  स्वतः चे घरावर सोन्याची कौले चढवली आहेत आणि सामान्य माणसाला फास  घरातील आड्याला लाऊन घेण्याची ही भीती वाटते की तो आढा मोडून पडला तर काय करू?

म्हणून तो शेतातील झाडे हुडकत फिरतो•

ही घराणी सर्वच वर्गात निर्माण झाली आहेत  ती मागास वर्गियात , इतर मागासवर्गीय समाजात व भटके विमुक्तात देखील निर्माण झाली आहेत •

¶ ****ते चोखतात आत्ता हाडे नव्या पिढीची"

"अद्याप ही दिलेला नाही डकार  त्यांनी""

 आपणाला हे चित्र बदलावयाचे आहे 

भविष्याच्या भीती घालून वर्तमानातील लूट कोणी ही करू नये म्हणून मी सावध करत आहे 

"लगेगी आग तो कही मकान जद मे होंगे""

"सिर्फ हमारा मकान थोडी है?"

म्हणून चालत रहा  राजकारणात  सारे क्षम्य असते नाहक विचारांचे ओझे  आपल्या खांद्यावर ठेऊन आपणास  सत्ता वंचित करण्याचा कुटील डाव कोण खेळत तर नाही का?हे तपासा 

तूर्त इतकेच,,,,,!



~~~~~~~~~~~~~~~~~~

ऍड अविनाश टी काले ,महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशान पार्टी,अकलूज 

ता माळशिरस , जिल्हा सोलापूर,

9960178213

~~~~~~~~~~~~~~~~~~

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post