गोरक्षण संस्थेच्या जागेत उभारलेले 23 अनाधिकृत दुकानांना महानगर पालिकेने ठोकले सील!
मलिदा लाटणार्या संस्थेच्या पदाधिकारी मध्ये भरली धसकी!
लातूर/प्रतिनिधी
शहरातील गुळ मार्केट भागातील स्क्रूप मार्केटमधील मनपाची परवानगी न घेता दुकान थाटून अनाधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या 23 व्यापाऱ्यांच्या दुकानांना एकाच दिवशी महापालिकेने सील ठोकल्याची धडाकेबाज कार्यवाही आज बुधवार दि. 14 जुलै रोजी केली.
मिळालेल्या माहिती नुसार गुळ मार्केट भागातील स्क्रॅप मार्केटमधील मनपाची परवानगी न घेता दुकान थाटून संस्थेच्या जागेवर अनाधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी शेड उभारण्यात आले होते,त्याबाबत महानगरपालीकेने दोन महिन्यापुर्वी नोटिस देवूनही बिनदिक्कत पणे राजरोस दुकाने किरायाने देवून या संस्थेचे काहि पदाधिकारी मलिदा लाटण्याचे काम करत होते.हि बाब कर्तव्यदक्ष आयुक्त अमन जी मित्तल याच्या नजरेत पडल्यानंतर लगेच कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
त्या अनुशंगाने शहरातील गुळ मार्केट भागात स्क्रॅप मार्केटमध्ये महानगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता पत्र्यांचे डब्बे बांधून व्यावसाय करणाऱ्या व्यावसायीकांच्या 20 बाय 100 क्षेत्रफळ असलेल्या 23 दुकानांना बुधवार दि.१४जुलै रोजी दुपारी ३:३०च्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सील ठोकण्याची कार्यवाही केली. एकाच दिवशी 23 दुकानांना सील ठोकण्याची कार्यवाही करण्याचे आदेश लातूर शहर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त अमन जी मित्तल यांनी दिल्यामुळे मलिदा लाटणार्या संस्थेच्या पदाथिकार्यामध्ये खळबळ उबाली,शहरातली ही सर्वात मोठी व पहिल्यांदाच असल्यामुळे सर्वत्र आयुक्त यांचे अभिनंदन होत आहे. केली आहे. ही कार्यवाही मनपा झोन सी चे प्रमुख समाधान सूर्यवंशी, तय्यब अली शेख, सुरेश कांबळे, अजय घोडके या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे.








