सामाजिक,धार्मिक व कौटुंबिक उपक्रमाने साजरा होणार माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांचा वाढदिवस
कोरोनाच्या पार्श्वभूमि ः संयोजन समितीचे एस.आर.मोरे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहनलातूर -
दरवर्षी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. पंरतु या वर्षी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने निर्धारित केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कौटुंबिक, सामाजिक, अध्यात्मिक अशा विधायक उपक्रमाने 11 जुलै 2021 रोजी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे माजी आ.कव्हेकर साहेबांवर भरभरून प्रेम करणार्या पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी वाढदिवसानिमीत्त कोरोना प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमांचे पालन करून शुभेच्छा द्याव्यात,असे आवाहन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर वाढदिवस संयोजन समितीचे अध्यक्ष एस.आर.मोरे, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कोरे, कार्याध्यक्ष जाफर पटेल व जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा वाढदिवसामानिमित्त घेण्यात येणार्या धार्मिक कार्यक्रमात गौरीशंकर मंदिर व सिध्देवर मंदिरात अभिषेक, शेखमियाँ दर्गा, सुरशहावली दर्गा चादर चढविणे हे उपक्रम घेण्यात येणार आहेत. तर सामाजिक उपक्रमामध्ये मातोश्री वृध्दाश्रम, शासकीय रूग्णालय, हासेगाव येथील सेवालयामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम व मोफत रूग्णसेवा दिली जाणार आहे. तसेच साप्ताहिक जननायकच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांच्या कार्यावरील “जननायक गौरव विशेषांक” विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याबरोबरच त्यांच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या गाठी-भेठी व वैयक्तिक शुभेच्छा स्वीकारल्या जाणार आहेत, अशी माहिती माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर वाढदिवस संयोजन समितीचे अध्यक्ष एस.आर.मोरे,जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कोरे, कार्याध्यक्ष जाफर पटेल व जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार आदींनी दिली.

