वाहतूक शाखेचा भोंगळ कारभार.!
खाजगी ईसम ठेवलेत दंड वसुल करण्यासाठी...!
लातूर-लातूर शहरात वाहतूक वाढली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाने हैराण केलेल्या सर्वसामान्य जनतेला आता थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रोडवर वाहने येण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेवर त्याचा तान वाढला आहे.परंतु इमानेइतबारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगाऊ ड्युट्या देण्यात येत असून ड्युटीच्या नावावर काही कर्मचारी यांनी खासगी ईसम ठेवल्याची जोरदार चर्चा वाहतूक कार्यालयाच्या बाहेर उघड होऊ लागली आहे. चक्क तो "पाॅस "मशीन घेवून वाहनाचे फोटो काढुन ,दंड ही गोळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार होत आहे, त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेचे चा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. सध्या वाहतूक शाखेचे इन्चार्ज पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला हे आहेत. 54 कर्मचारी सध्या कामावर असल्याचे समजते ,त्या सर्वाना ड्युट्या देण्यात आल्या, मात्र त्यापैकी नंबर चौक शिवाजी चौक गुळ मार्केट दिल असणारे कर्मचारी वेळेवर ड्युटी करताना निदर्शनास आले. 54 पैकी निम्मे कर्मचारी कामावर काम करत असल्याचे बोलले जात आहे, बाकीचे कर्मचारी नेमके कोणती ड्युटी करतात? आणि कुठे ?आसा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. काही जागेवर तर "स्पाॅस "मशीन घेऊन खाजगी ईसम फिरत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम राहत आहे नाहक येणार्याजानार्यांना अडवून दंड वसूल करत असल्याचेही समोर येत आहे ते नेमके कोणाच्या इशार्यावर लोकांची लूट करत आहेत? वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला यांनी या विषयावर मौनव्रृत धारण केले असल्याची चर्चा कार्यालयाबाहेर होत आहे. यावर माननीय एसपी साहेब काय कारवाई करणार? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.







