पानगावात स्वराज कृषी सेवा केंद्रात सल्फर घेतला तरच मिळतोय डीएपी
परवाना रद्द करा अन्यथा शेतकरी चव्हाण करणार कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
लातूर,- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शेतकर्यांची पेरणीसाठी मोठी लगबग सुरू आहे बळीराजा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सावकाराचे कर्ज काढून बियाणे व खते विकत घेत आहेत मात्र रेणापूर तालुक्यातील पानगावात असलेल्या स्वराज कृषी सेवा केंद्राने शेतकर्यांची मोठी लूट सुरू केले आहे. पानगाव येथील शेतकरी निळकंठेश्वर चव्हाण हे स्वराज कृषी सेवा केंद्रांमध्ये आज शुक्रवार दिनांक ११ जून रोजी डीएपी खत घेण्यासाठी गेले असता कृषी सेवा केंद्र चालकाने सल्फर खत घेतला तरच डीएपी खत मिळेल अन्यथा डीएपी खत मिळणार नाही अशी तंबी देत विनाकारण सल्फर खत घेण्यास शेतकर्यांना भाग पाडत आहेत त्यामुळे शेतकर्यांची मोठी आर्थिक लूट होत असून याबाबत शेतकरी निळकंठेश्वर चव्हाण यांनी आज लातूर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पानगाव येथील स्वराज्य कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याबाबत निवेदन दिले असून या कृषी सेवा केंद्राचा परवाना १८ जून पर्यंत रद्द नाही झाल्यास चव्हाण यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
शेतकरी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकरी सावकाराच्या दारात खेटे मारून कर्ज काढून बी बियाणे व खते खरेदी करीत आहेत अशाच प्रकारे आज शुक्रवारी पानगाव येथील शेतकरी निळकंठेश्वर चव्हाण येथील स्वराज कृषी सेवा केंद्रावर डीएपी खत घेण्यासाठी गेले असता त्यांना कृषी सेवा केंद्र चालकांनी सल्फर खत घेतला तरच डीएपी खत मिळेल अन्यथा मिळणार नाही असे सांगितले असता चव्हाण यांनी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत डीएपी खत घेण्या एवढेच पैसे असल्याचे सांगितले मात्र कृषी सेवा केंद्र चालकाने या शेतकरी चव्हाण यांना डीएपी खत न देता दुकानातून उंचकाऊन लावले दरम्यान शेतकरी निळकंठ चव्हाण यांनी पानगाव येथील कृषी सेवा केंद्राच्या मनमानी व शेतकर्यांच्या आर्थिक लूट करीत असल्या प्रकरणी लातूर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की पानगावातील स्वराज कृषी सेवा केंद्र शेतकर्यांची करीत असलेली आर्थिक लूट व पिळवणूक थांबवावी व या कृषी सेवा केंद्राची उच्चस्तरीय चौकशी करून परवाना तात्काळ रद्द करावा अन्यथा कृषी अधीक्षक कार्यालय समोर येणार्या १८ तारखे पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सदरील निवेदनाच्या प्रती जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक लातूर, संचालक व नियंत्रक कृषी आयुक्तालय पुणे यांनाही देण्यात आले आहेत.


