सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बारवर छापा ; नृत्यांगनांसह ३७ जणांना केली अटक...
सोलापुर/प्रतिनिधि ईमाम जमादार
सोलापूर,दि.१२ : बाळे येथील शिवाजीनगरातील हॉटेल पॅराडाईज आर्केस्ट्रा बारवर शहर गुन्हे शाखेने छापा टाकून आठ नृत्यांगनांसह २ इसमांना ताब्यात घेण्यात आले यावेळी केलेल्या कारवाईत रोख रक्कम, वाहने मोबाइल हॅन्डसेटसह सुमारे लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश असताना शिवाजीनगर येथील हॉटेल पॅराडाईजचा मालक बाबा जाफर पठाण हा संजय पोळ व व्यवस्थापक मुकेशसिंह बायस यांच्याकरवी ऑर्केस्ट्रा बार चालवित आहे, बारमध्ये महिला अर्धनग्न अवस्थेत अश्लील हावभाव करुन डान्स करीत आहेत व काही इसम त्यांच्या अंगावर नोटा उधळून त्यांच्या शरीराला स्पर्श करीत आहेत, अशी खात्रीलायक माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना मिळाली.
या छाप्याच्या कारवाईत पोलिसांनी २९ पुरुष व ८ महिला यांना ताब्यात घेतले तसेच सुमारे ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी संजय पोळ ( रा. आर्य चाणक्य नगर, सैफुल ) मुकेशसिंह बायस ( रा. राधे अपार्टमेंट, वसंतविहार फेज -३ ) अजिंक्य देशमुख ( रा. रमणनगर अक्कलकोट रोड ), मयुर पवार ( रा. बोळेगाव, ता.देवणी ), विजय तिवारी ( रा. शहा बझार, कलबुर्गी) विशाल कोळी ( रा . कृष्णा नगरी सैफुल ), नितीन सासणे ( रा. जय मल्हारनगर, बाळे ), गोपाळ जाधव ( रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं .६ ), सुधाकर माने ( रा. श्यामरावनगर, कोंडी ), श्रीकांत शिंदे ( रा. संभाजीनगर, गुळवंची, ता. उत्तर सोलापूर ), आकाश कांबळे ( रा. बुधवार पेठ , मिलिंदनगर ), मारूती केत ( रा. मुळेगाव तांडा ), रजनीश भोसले ( रा. रविवार पेठ, जोशी गल्ली) सचिन जाधव ( रा. भैरु वस्ती, दमाणीनगर ), अमर जमादार ( रा. जुनी मिल चाळ मुरारजी पेठ ), आकाश ऊर्फ भीम गुरव ( रा. अभिमानश्रीनगर, जुना पुणे नाका ), दीपक चव्हाण ( रा. भूषणनगर, वांगी रोड ), प्रकाश वाघमारे ( रा. शासकीय दूध डेअरी निवासस्थान, सातरस्ता ) पुरूषोत्तम बन्ने ( रा. उत्तर कसबा ) अमिताब वाघमारे ( रा. सिध्दार्थ हौसिंग सोसायटी ), अजय धजाल (रा. दक्षिण सदर बझार ), प्रसाद लोंढे (रा. अवंतीनगर फेज -१), प्रवीणकुमार शिंदे (रा. कल्याणनगर, सिंदगी), प्रशांत गायकवाड (रा. बेघर हौसिंग सोसायटी), प्रभाकर फताटे ( रा. मल्लिकार्जुननगर, अक्कलकोट रोड ), राजकुमार उडचाण ( रा. ढाले गल्ली, कडबगाव, ता. अक्कलकोट ), निसार मुजावर ( रा. भवानी पेठ ), गौस शेख ( रा. साईनाथनगर भाग -२ ), संतोष कदम ( रा. सन्मित्रनगर, दहिटणे रोड, शेळगी ) व ८ नर्तिका यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आहे.
त्यावरुन शहर गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री पावणेबाराच्यास सुमारास ही छाप्याची कारवाई केली. महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमास ५० टक्के लोकांच्या परवानगीचे आदेश दिले असताना देखील पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देऊन बेकायदेशीर जमाव जमविला होता. त्यांनी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेला संसर्गजन्य रोग पसरवून जीवितास धोका पसरवण्याची कृती केली. तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये आलेल्या ग्राहकांना विनापरवाना मद्य पुरविल्याचे छाप्याचे कारवाईत निष्पन्न झाले.
*ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय साळुखे, सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, निखिल पवार, फौजदार संदीप शिंदे, शैलेश खेडकर व पथकाने केली.*








