Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांचा वाढदिवस बालगोपाळाच्या आनंदोत्सवाने साजरा..

 माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांचा वाढदिवस बालगोपाळाच्या आनंदोत्सवाने साजरा..




लातूर दि २२

 चाकुर/ प्रतिनिधी सुनील शििंदे


वाईस:- राज्याचे माजी मंञी तथा मराठवाड्याचे लोकनेते आमदार :- संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार:- सुधाकरराव श्रृंगारे यांच्या वतीने युवा नेते शंकर श्रृंगारे यांनी एक नवी संकल्पना राबवून तांडा वस्ती, दूर्मिळ भागातील लोकांसोबत व त्यांच्या बालगोपाळ,महिलांसोबत उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला.


यावेळी युवा नेते:-  शंकर श्रृंगारे यांनी आमदार:-  संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाच्या प्रत्येक अक्षराचा केक तयार करुन बालगोपाळांच्या हस्ते तो कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

लातूरातील वसवाडी भागात राहणाऱ्या लोकांची ओळख समूहाच्या बाहेरची अशा व्यवस्थेतील व भिक्षा मागून खाणारे तसेच दारोदार,गावोगाव पोटासाठी भटकंती करुन आपला उदरनिर्वाह भागवत असतात अशा लोकांसोबत वाढदिवस साजरा करावा हा उदात्त हेतूने या लोकांसोबत आपला आनंद व्दिगुणीत करावा ही सामाजिक बांधिलकी मनात बाळगून अनेक वर्षापासून लातूर जिल्ह्यात वास्तव्यास असणारे काही गरीब लोक प्रवाहापासून दूर, त्यांचे जग निराळेच.त्यांच्या भूकेचा प्रश्न मिटवणे शक्य नाही परंतु आपण काहीतरी देणे लागतो हीच भावना डोळ्यासमोर ठेवून हा छोटासा प्रयत्न वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे.बालगोपाळाच्या सोबत वाढदिवस साजरा करणे हा आनंदच वेगळा तेथील महिलांना साडी देऊन सन्मान करणे,बालकांमध्ये खेळाडूवृत्ती व त्यांच्यात खेळाबद्दलची आवड निर्माण व्हावी ही भावना उराशी बाळगून मुलांना क्रीडाविश्वाचा अभ्यास व्हावा त्यांचे भवितव्य घडावे या पाठीमागची हीच भूमिका असून त्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.



यामध्ये व्हाँलीबाँल,बाँल बँडमिंटन,क्रिकेटचे साहित्य,फुटबाँल आदीचा समावेश होता.

महिनाभर पुरेल येवढे अन्नधान्य कीट त्यांच्या कुटुंबाला मिळाले पाहिजे त्यातूनच ही संकल्पना आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसदिनी साकार झाली.

कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून मास्कचे वाटप करुन तेथील भागात वृक्षारोपन करण्यात आले तसेच महिलांना वृक्ष वाटप करुन वस्ती,तांडा व अनेक झोपडीतील लोकांची त्यांच्या लेकरांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. यातून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस वेगळ्या जगातील लोकांसोबत साजरा करावा एवढाच यापाठीमागची भूमिका आहे.

यावेळी युवा नेते शंकर श्रृंगारे,क्षीतीज गायकवाड,समीर लातूरकर,स्नेहंक आदमाने व तेथील नागरिक,महिला बाल गोपाळ उपस्थित होते.                  (

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post