Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही : डी. टी. आंबेगावे

 पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही : डी. टी. आंबेगाव

उदगीर येथे पत्रकारांना मास्क आणि नियुक्ति पत्र वाटप





















उदगीर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संघाची उदगीर, देवणी, जळकोट व अहमदपूर तालुका कार्यकारिणीची अक्षरनंदन विद्यालय उदगीर येथे नुकतीच बैठक पार पडली.  यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही व पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी कायम लढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष अनंत पाटील, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजूळे, कायदेविषयक सल्लागार अॅड जयवर्धन भाले, जिल्हा सरचिटणीस अर्जुन जाधव डॉ. रामप्रसाद लखोटिया, नवउद्योजक भास्कर पाटील, मुख्याध्यापक शिवशंकर जिवने, एम. टी. बिरादार, उदगीर, देवणी, जळकोट व अहमदपूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोविड काळात विशेष उल्लेखनीय कार्य केलेले डॉ. रामप्रसाद लखोटिया, नवउद्योजक भास्कर पाटील, मुख्याध्यापक शिवशंकर जिवने, एम. टी.बिराजदार यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने कोविड योद्धाने सन्मान करण्यात आला तसेच पत्रकारांना संघटनेच्या नावाचे मास्क डॉक्टर रामप्रसाद लखोटिया व मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना वाटप करण्यात आले. यावेळी उदगीर तालुकाध्यक्ष पदी नागनाथ गुट्टे, संपर्कप्रमुख जीवन भोसले, जिल्हा सरचिटणीस डॉ. विष्णू कांबळे, देवणी तालुका कार्याध्यक्षपदी कृष्णा पिंजरे, देवणी तालुका उपाध्यक्षपदी बालाजी टाळीकुटे, उदगीर तालुका युवा उपाध्यक्षपदी शेख अझरुद्दीन, तालुका संघटकपदी मनोज पाटील, जळकोट तालुका उपाध्यक्षपदी शेख चांद सय्यद, उदगीर ग्रामीण उपाध्यक्षपदी नागनाथ बंडे आदी पदाधिकार्‍यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा मास्क वाटपाचा उपक्रम स्तुत्य असून पत्रकारांनी समाज परिवर्तनासाठी पत्रकारिता करावी असेही आवाहन केले. मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर यांनी पत्रकारांचे कल्याण व उत्कर्ष करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी संघटनेने घेतली असल्याचे सांगितले. राज्य उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडविले जात असल्याचे प्रतिपादन केले. लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी पत्रकारांचे न्याय हक्कासाठी कधीही आवाज द्या तात्काळ आम्ही न्यायासाठी लढा उभा करू असा विश्वास दिला. अॅड  जयवर्धन भाले यांनी पत्रकारांच्या न्यायासाठी आम्ही सोबत आहोत असे सांगितले. जिल्हा संघटक संजय राजूळे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून उत्कृष्ट असे निवेदन केले तर देवणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी आभार मानले.

 याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ओमकार टाले, देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, अहमदपूर तालुकाध्यक्ष महादेव महाजन, जळकोट तालुकाध्यक्ष माधव होणराव, संघटनेचे पदाधिकारी नामदेव केंद्रे, मन्मथ मठपती, मारुती फुलारी, आनंद कांबळे, श्याम वाघमारे, विकास भंडे नागनाथ बंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post