Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

संभाजीरावांनी जिल्हयाात भाजपा वाढविण्याचे काम केले माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 संभाजीरावांनी जिल्हयाात भाजपा वाढविण्याचे काम केले

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर



लातूर दि.20/06/2021
लातूरचे माजी पालकमंत्री संभाजीरावांनी भाजपा युवा मार्चाचे अध्यक्ष ते मंत्री म्हणून चांगले काम केलेले आहे. ते उच्च विभूषित असुन त्यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 10 पैकी 07 पंचायत समित्या व जिल्हा परिषदेतही बहूमत मिळविले या बरोबरच लातूर महापालीकेतही झीरो टू हिरो भाजपा बनविण्याचे काम केले  त्यामुळे लातूर शहर व जिल्हयाच्या परिसरामध्ये तळागाळापर्यंत भाजपा पोहांचली त्यामुळे खर्‍या अर्थाने संभाजीरावानी जिल्हयात भाजपा वाढविण्याचे काम प्रभावी पणे केलेले आहे असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आमदार यांनी केले.यावेळी ते भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हयाच्या वतीने आयोजीत डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर अभ्यासिका केंद्र व स्पर्धा परिक्षा लोकार्पण सोहळया प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाअध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएम चे शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, भाजपा नगर सेवीका सौ.भाग्यश्री शेळके, बालाजी शेळके, जाफर पटेल, महात्मा बस्वेश्‍वर मंडळाचे अध्यक्ष संजय गिर, अ‍ॅड.गणेश गोजमगुडे, सागर घोडके, गजेंद्र बोकण, कमलाकर डोके,  महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य मोहन खुर्दळे, संतोष ठाकुर, वैभव डोगरे, आदी मान्यवरांची उपस्थीती होती.
यावेळी पुढे बोलताना भाजपा नेते तथा माजी आ.कव्हेकर म्हणाले की राज्यात असलेले आघाडी सरकार कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे.मध्य प्रदेश व दिल्‍ली राज्यसरकारणे कोरणा काळात मृत्य पावलेल्या कुटूंबीयाना 50 हजाराची मदत केली. तर केेंद्र सरकारणे कोरोणासाठी 21 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले तसेच कोरोणा काळात मोफत लसीचे नियोजन केले परंतू राज्य सरकारणे मात्र काहीही केलेेले नाही त्यामुळे राज्य सरकार कोरोणा काळात पूर्ण पणे अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात सर्वानी भाजपाच्या पाठीशी सक्षम पणे उभे रहावे असे अवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे कर्मयोगी व चारित्रसंपन्‍न नेते होते. त्यामुळे आभ्यासिका केंद्राला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव देण्यात आले त्या वरूण कव्हेकर साहेबांनी या वेळी निलंगेकर हे सर्वसामान्य व्यक्‍तीला न्याय देणारे कार्यकर्ते व सहकार्‍यांना सन्मान व परिवारा प्रमाणे वागवत असत ते प्रचंड अभ्यासु धाडसी नेते होते. त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या व विषेशतः मराठवाडयाच्या विकासाचे भरिव कार्य झाले असे नेते महाराष्ट्रात दूर्मीळ आहेत असे भावपूर्ण उदगार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी या वेळी बोलताना व्यक्‍त केले.प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले यावेळी एन.टी.एस. परिक्षेत यश मिळविलेल्या सिध्दार्थ माने, भाग्यश्री मुंडे, गणेश बेंबडे, प्रांजली स्वामी, ज्योती दासरे, या विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार आब्दुल गालीब शेख यांनी मानले. या कार्यक्रमाला अनिल पूजारी, एाम राठोड, आकाश पिटले, अमित पोतदार, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, यांच्यासह भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जेएसपीएम परिवारातील शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांची उपस्थीती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण
गेल्या चार वर्षापूर्वी मनपा निवडणूकीच्या जाहीरनाम्यामध्ये मोफत स्पर्धा परिक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता तो आज पूर्ण होत आहे. आज राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील  निलंगेकर यांच्या नावाने अभ्यासिका व मोफत स्पर्धा परिक्षा केंद्र सुररू करण्यात आलेले आहे. केंद्रातून एक विद्यार्थी जरी भविष्यात अधिकारी झाला तर आम्ही सुरू केलेल्या स्पर्धा परिक्षा केंद्राचे सार्थक होईल असा विश्‍वास बोलून दाखवत भाजयुमोच्या टीमचे ही त्यांनी आभार मानले व भविष्यातही पक्षाच्या वाढीसाठी  पक्षाच्या विचारासाठी एक जूटीने काम करू असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी बोलून दाखविला.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post