Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकार व कुटुंबियांचे प्रश्न मार्गी लावणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर

 पत्रकार व कुटुंबियांचे प्रश्न मार्गी लावणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर 



लातूर : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा कार्यकारणीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचा सदर बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पन्हाळे, अजयभाऊ सुर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन भाले, जिल्हा संघटक संजय राजूळे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली पाटील,आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लातूर जिल्हा उपाध्यक्ष दयानंद एरंडे, लातूर तालुका उपाध्यक्ष हरिदास पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, चाकूर तालुका सदस्य सुनील शिंदे, यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.












याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण होऊ देणार नाही असा विश्वास दिला. राज्य उपाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे आणि लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी महिला पत्रकारांचे विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याचे सांगितले. राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य सुरू असून लातूर जिल्ह्यात सुध्दा संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत करणार असून दोन गरीब मुलींची यावेळी भेट घेऊन त्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्याचा विश्वास दिला. राज्य उपाध्यक्ष अजयभाऊ सुर्यवंशी यांनी कोविडच्या काळात ज्या पत्रकारांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर यांनी लातूर जिल्ह्यातील गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी सुरू करावे व ज्या कुटुंबांना वेळेवर रॅशन मिळत नाही त्यांना संघाच्या माध्यमातून वेळेवर रॅशन मिळवून देऊ असा विश्वास दिला. जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले यांनी बँक किंवा खाजगी फायनन्सवाले गरीबांच्या मागे हफ्ते भरा असा तगादा लावला असून बँक व फायनन्स कंपनीना कोविडच्या काळात हफ्ते भरण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा अशी भूमिका मांडली. जिल्हा संघटक संजय राजुळे यांनी गरिबांना मदत करू असे मत स्पष्ट केले तर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याने राज्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी पत्रकार सचिन सूर्यवंशी, पत्रकार सुनील फुलारी, पत्रकार नितीन हांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post