Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना हात देणारे युवा नेतृत्व अरविंद पाटील निलंगेकर

 अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना हात देणारे युवा नेतृत्व अरविंद पाटील निलंगेकर



अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना हात देणारे युवा नेतृत्व अरविंद पाटील निलंगेकर हे माजी कॅबिनेट मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लातूर जिल्हा आणि मराठवाङयाचा विकास साधता यावा यासाठी तळमळीने काम करणारे युवा नेतृत्व म्हणजे अरविंद पाटील निलंगेकर,हे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे छोटे बंधू .निलंगा तालुक्यात किंबहुना सबंध राजकारणामध्ये त्यांना छोटू पाटील या नावाने ओळखले जाते सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काम करणारे युवा नेतृत्व लोकांमध्ये मिसळणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गावागावात व्यायाम शाळा उघडणे हा त्यांचा छंद आहे स्पष्ट व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सर्वजण पाहतात जे होते ते होते ,जे नाही होत त्यास पूर्णत्वाकडे नेण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. युवा पिढीला एकत्रित व सामाजिक बांधिलकीचा मेळ घातला आहे. शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रात कामाचा ठसा उमटवला आहे.



 कोरोना  परिस्थितीमध्ये ते आपल्या जीवाची पर्वा न करता तालुक्यात प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबाची चौकशी करून त्यांना दिलासा दिला लग्नकार्य असो वा इतर कार्यक्रम असो ते करून आला न भिता बिंदास वावरले आणि लोकांना धीर दिला एक म्हणता दोन वेळेला त्यांना करोना ची लागण झाली तरी ते न डगमगता त्यातून सहीसलामत बाहेर पडले, जनसामान्यात मिसळले या त्यांच्या स्वभावावर तालुकातील युवा पिढी खुश आहे प्रत्येक गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध आजी-माजी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व गावातील सरपंच तसेच माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी महिला बचत गट व इतर संघटना युवा मंडळी व त्यांची पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन प्रत्येक गाव व शहर विकासाच्या माध्यमातून लातूर जिल्हा रोल मॉडेल ठरावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात अशा या नावात छोटू मात्र कामोठे करणाऱ्या अरविंद पाटील निलंगेकर उर्फ छोटू भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post