थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी लातूर मनपाने किर्ती ऑईल मीलला ठोकले सील
लातूर/ प्रतिनिधी : लातूर मनपाच्यावतीने सध्या शहरातील नागरिक तसेच उद्योग व्यवसायीकांकडे असलेल्या मालमत्ता कराची वसूली मोहिम जोरदारपणे केली जात आहे. थकबाकीदारांना वारंवार सुचना करुन ही मालमत्ता कराचा भरणा होत नसल्याने मनपाने मोठया थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहिम सुरू करुन कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन लातूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या किर्ती ऑईल मीलला आज मंगळवार (दि.2 मार्च) रोजी सील ठोकण्यात आले आहे. या मीलकडे जवळपास 2 कोटी रुपयांच्या कराची थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.हि कार्य़वाही महानगर पालिकेच्या उपायुक्त वसुधा फड आणि झोनल अधिकारी यांच्यासह वसुली अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

