आश्रम शाळेतील शिक्षकांचे वेतन दरमहा पाच तारखेपर्यंत करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे यांच्या कडून उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
उस्मानाबाद/प्रतिनिधि
वेतन निलंबनामुळे बँक पत्संस्था कडून शिक्षक कर्मचाऱ्यांना दंड व्याजाचा भुर्दंड होत असल्याने पाच तारखेपर्यंत राज्य शासकीय जिल्हा परिषद अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा आश्रम शाळा अंतर्गत शिक्षकांचे वेतन दर महा 5तारखेलाअदा करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे यांच्यातर्फे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात आश्रम शाळेचे वेतन अपवाद वगळता उशिराने वीस ते पंचवीस तारखेला वेतन होते त्यामुळे बँकांना कर्मचाऱ्यांकडून नाहक दंड व्याज भरावा लागत आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागास शिक्षकांचे वेतन दरमहा पाच तारखेला करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे.



