परिवार पॅनलच्या उमेदवारांना कसलाही विरोध नाही - भूषण दाते यांचे स्पष्टीकरण
सोलापूर जनता सहकारी बँक निवडणूक
लातूर/प्रतिनिधी:सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या वतीने उभे करण्यात आलेल्या कोणत्याही उमेदवारास आपला कसलाही विरोध नाही,असे स्पष्टीकरण भूषण दाते यांनी दिले आहे.
दाते यांनी म्हटले आहे की,
बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या वतीने १७ उमेदवार उभे करण्यात आले आहेत.या निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मला अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार मी अर्ज भरला परंतु नंतर संघाकडूनच अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली.त्यानुसार मी अर्ज मागे घेतला आहे.
या निवडणुकीसाठी लातूर येथील विनोद कुचेरिया हे उमेदवार आहेत.त्यांच्या नावास व एकूणच कुठल्याही उमेदवारास आपला कसलाही विरोध नाही. व्यावसायिक कामात व्यस्त असल्यामुळे निवडणुकीच्या कार्यात मी सक्रिय होऊ शकलो नाही,असेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जात आहेत.त्यात माझ्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
उमेदवारी न मिळाल्यामुळे मी नाराज असल्याचे त्यात सांगण्यात येत असून ते चुकीचे आहे.अशा अफवांवर विश्वास न ठेवता सभासद- मतदारांनी परिवार पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे.रविवारी (दि.१४ मार्च )होणाऱ्या मतदानात पॅनलच्या किटली या चिन्हावर शिक्का मारून सोलापूर जनता सहकारी बँकेचा विकास करण्यास परिवार पॅनलच्या उमेदवारांना संधी द्यावी,असे आवाहनही भूषण दाते यांनी केले आहे.
