सोलापूर बँकेच्या निवडणूकीत संघ परिवारात दुफळी
भूषण दाते यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी..
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे
लातूर दि.सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या रविवारी मतदान होत असून निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दुफळी माजली आहे याचे दर्शन शनिवारी घडले .ज्यांनी बँक स्थापनेत रक्ताचे पाणी करून अहोरात्र कष्ट उपसले , बँक उभारणीत प्रसंगी पदरमोड केली त्या कैलासवासी सदाशिवराव दाते काका यांचे चिरंजीव असलेल्या भूषण दाते यास उमेदवारी नाकारल्यामुळे संघ परिवारात प्रचंड नाराजी पसरली आहे.
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार प्रारंभी भूषण दाते याना उमेदवारी देण्यात येईल असे सांगितले गेले आणि ऐनवेळी त्यांना डावलून विनोद कुचेरीया यांना उमेदवारी दिली गेली. यामुळें दाते नाराज झाले आहेत. दाते परिवारावर प्रेम करणारा मोठा वर्ग लातूर जिल्ह्यात आहे. प्रचारा दरम्यान भूषण दाते कुठेच दिसले नाहीत . आजच्या मेळाव्यातसुद्धा ते दिसले नाहीत.
... सोलापूर जनता सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत परिवार पॅनल व बँक बचाव पॅनल असे दोन पॅनल उभे राहिले असून या दोन्ही पॅनलच्या वतीने लातुरात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. परिवार पॅनलच्या वतीने शनिवारी सायंकाळी भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. मात्र या पत्रकार परिषदेत भूषण दाते यांच्यासह बँक उभारणीत ज्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती आणि लातूरमध्ये बँकेची शाखा स्थापन करण्यातसाठी अहोरात्र कष्ट उपसले होते त्यातील अनेक जण पत्रकार परिषदेस व लातुरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास अनुपस्थित होते.
या बँकेच्या निवडणूक प्रचारासाठी शुक्रवारी दुपारी भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात ग्राहक व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्यास प्रतिसास अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला .अनेक दिग्गजांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली होती. भूषण दाते देखील या मेळाव्यास अनुपस्थित होते. त्यामुळे संघ परिवारात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असल्याचे दिसून आले .याचा परिणाम मतदानावर होणार असून लातुरात साडेतीन हजार मतदार आहेत त्याचा मोठा फटका सताधारी परिवार पँनलला बसू शकतो ,अशी अशी चर्चा यावेळी ऐकायला मिळावे मिळावे स्थळी ऐकावयास मिळाली .पत्रकार परिषद असून मेळावा आयोजित करण्यात आला होता आपणास काही विचारायचे असेल ते विचारा ही पत्रकार परिषद नाही असा जावईशोध आनंदराव कुलकर्णी यांनी लावला आणि पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परिवार पँनलमध्ये उभे असलेले अनेक उमेदवार देखील यावेळी अनुपस्थित होते .त्यामुळे संघ परिवाराचे देखील काँग्रेसी करन झाले आहे की काय ? असा सवाल या निमित्ताने संघ परिवारातील अनेकांनी उपस्थित केला आहे.
