ॳॅड . विश्वंभरराव माने यांचे दु : खद निधन ....
शिरूर अनंतपाळ / प्रतिनिधी : -
तालुक्यातील मौजे लक्कड जवळगा येथील सुपुत्र महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सचे माजी चेअरमन शिवनेरी महाविद्यालयाचे अध्यक्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक अॅड विश्वंभररावजी माने वय ८२ वर्षे यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्ययान पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दि .१९ मार्च रोजी सकाळी ९ .३०च्या दरम्यान दुःखद निधन झाले . एक संयमी अनुभवी कुशल राजकारणी कुशल प्रशासक, निर्भी्ड व्यक्तिमत्व शिरूर आनंतपाळ तालुका वासियांनी गमावले असून
त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण लक्कड जवळगा गावावर व माने कुटुंबावर शोककळा पसरली आहे .
त्यांच्या पश्चात दोन मुले , दोन मुली सुना नातवंडे असा परिवार असून ते शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयेश माने यांचे वडील होत . व लातूर येथील इंटरनॉशनल विश्वमित्रा हॉटेलचे मालक होते . त्यांच्यावर दिनांक २० मार्च रोजी त्यांच्या मूळ गावी लक्कड जवळगा येथे सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ..
![]() |
