बँकेच्या विषारी प्रचाराला ग्राहकाने बळी पडू नये किशोर देशपांडे यांचे आवाहन
परिवार पँनल.प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
लातूर दि. ११ ( प्रतिनिधी.) : सोलापूर जनता सहकारी बँक लि. या बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी होत असून *"परिवार पॅनल" च्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन विवेकानंद रुग्णालयाचे विश्वस्त व प्रसिद्ध डॉक्टर गोपीकिशन भराडीया यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी लातूरचे उमेदवार विनोद कुचेरीया यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले . त्यावेळी गुरुनाथ मगे, अतुल ठोबरे, विवेकराव अयाचित, सुधाकरराव कुलकर्णी, शिवदास मिटकरी, धनंजय कुलकर्णी तुंगीकर, विनोद कुचेरीया आदी उपस्थित होते.
..........
बँकेच्या विषारी प्रचाराला ग्राहकाने बळी पडू नये किशोर देशपांडे यांचे आवाहन
……...
- सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी होत असून , यानिमित्त बचाव परिवार पँनल चे उमेदवार बँकेविषयी विषारी प्रचार करून ग्राहक व समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत . त्यांचा हा प्रचार चुकीचा असून ग्राहकांनी त्याला बळी पडू नये असे आवाहन परिवार पॅनलचे निवडणूक प्रचार प्रमुख किशोर देशपांडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
किशोर देशपांडे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून व सोशल मीडियाच्द्वारे व्हिडीओ क्लिपद्वारे विरोधक असलेले सर्व आरोप खोडून काढले आहेत. सोलापूर जनता बँक आर्थिक अडचणीत सापडली असल्याचा विरोधकांचा आरोप पूर्णतः चुकीचा असून अतिवृष्टी , ,दुष्काळ व कोवीडचे संकट यामुळे सर्वच नागरी बँका आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. परंतु विरोधक याचे भांडवल करून सोलापूर बँक जनता बँकेविषयी चुकीचा अपप्रचार करीत आहेत , त्याला ग्राहकांनी बळी पडू नये असे आवाहनही देशपांडे यांनी यावेळी बोलताना केले.
सोलापूर जनता बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे .बँकेची प्रगती पण चांगली होत आहे .येत्या पाच वर्षात 0% एनपीए करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे तसेच पाच वर्षात पाच हजार कोटींचा व्यवसाय करण्यात येणार असल्याचा खुलासाही किशोर देशपांडे यांनी यावेळी बोलताना केला.
