Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भ्रष्टाचार उघडा पडण्याच्या भितीने काँग्रेसच्या महापौरांनी online बैठक offline मध्ये गुंडाळली*

 भ्रष्टाचार उघडा पडण्याच्या भितीने काँग्रेसच्या महापौरांनी online बैठक offline मध्ये गुंडाळली



दि. १३ लातूर - १२ फेब्रु ला मनपाची ३४ विषय घेऊन online बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर भाजपा ने आक्षेप घेतला होता. सर्व सदस्य कनेक्ट होत नाहीत अशा तक्रारी महापौरांकडे करण्यात आल्या.
       मात्र महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करत बैठक चालु ठेवली. काँग्रेसच्या सदस्यांनाही online अडथळे येत होते. त्यामुळे काँग्रेसचे गटनेते व इतर नगरसेवक महापौरांच्या दालनात पोचले. ते तिथे बसून बैठकीत सामिल होऊन घाईने विषयास मंजुरी देत सुटले.
    याला भाजपा गटनेते शैलेश गोजमगुंडे भाजपा अध्यक्ष गुरुनाथ मगे, शैलेश स्वामी, भाग्यश्री कौळखेरे, ज्योती आवसकर, व्यंकट वाघमारे, मंगेश बिराजदार, स्वाती घोरपडे, रागिणी यादव, समिना शेख, शोभा पाटील, श्वेता लोंढे यांनी महापौर बसलेल्या दालनात जाऊन व तर इतर नगरसेवकांनी online आक्षेप घेतला.
           विषय पत्रिकेतील अनेक विषय हे भ्रष्टाचाराशी संबंधित होते. त्यावर चर्चा घडु नये, ते लोकांना कळू नये या उद्देशाने महापौरांनी भाजपा च्या सदस्यांना बोलण्यास परवानगी न देता सर्व विषय मंजुर झाल्याचे घोषित केले. 
       या विषयी यापूर्वीच भाजपाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुजोरीने मंजुर केलेले विषय अंतिम होणार नाहीत. आणि जर झालेच तर येत्या काळात त्या त्या विषयातील भ्रष्टाचार कागदोपत्री पुराव्यासह ऊच्च न्यायालयात व जनतेच्या न्यायालयात सादर केले जातील असे या पत्रकाद्वारे गटनेता शैलेश गोजमगुंडे व भाजपा अध्यक्ष गुरुनाथ मगे आपणास कळवित आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post