महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून उदगीर प्रकरणी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाईची मागणी
लातूर/ प्रतिनिधि- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आठ फेब्रुवारी रोजी उदगीर येथील परिवहन कार्यालयात एका कथित पत्रकाराने ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाइन परीक्षा दिली मात्र त्यात तो नापास झाला आणि त्यांनी तेथे उपस्थित कर्तव्यदक्षअधिकार्यावर आरोप केले. हा प्रकार निंदनीय असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अशा कोणत्याही घटनेला किंवा अशा घटनेशी निगडीत व्यक्तीला समर्थन देत नाही. त्यामुळे विनाकारन कोणी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला त्रास देतअसतील तर त्यांच्यावर कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अमर पाटील यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया लातूर च्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आली आहे .

