लेखक'योगेश मोरे',दिग्दर्शक संजय यु.पाटील यांनी सुप्रसिद्ध गायक "अतुल दिवे" यांची घेतली भेट
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, गीतकार,कथा पटकथा लेखक तथा पत्रकार कल्याण संघटनेचे महाराष्ट्र राज्यसचिव "योगेश तुळशीराम मोरे" व सुप्रसिद्ध दिग्दर्शक "संजय उत्तमराव पाटील" यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गायक "अतुल मनोहर दिवे' यांची औरंगाबाद येथे त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली असता,गायक तथा संगीतकार "अतुल दिवे" यांनी एकोणतीस मराठी चित्रपटात संगीत दिलेले असून; त्यामध्ये भंडारा,लई भन्नाट,नाते नाते,जय हिंद,होता असा कधी तरी,अट्टाहास,पाणी बानी आदी चित्रपटाचा समावेश असून,अतुल दिवे यांनी ब्यांनव् टीव्ही सिरीयलमध्ये गाणी गायलेली असून, त्यामध्ये आशा अभिलाषा,इनमिन साडेतीन,येस मिलोर्ड,पटलं तर घ्या,स्वामिनी,सावली,चार चौघी,बंदिशाला,चल यात्रिका,हरिद्वार,माता रेणुका आदींचा समावेश आहे.
अतुल दिवे यांनी पंधराशेपेक्षा जास्त गाणी संगीतबद्ध केली; तसेच त्यांची गाणी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर,चंद्रशेखर गाडगीळ, शंकर महादेवन,आदर्श शिंदे,साधना सरगम,वैशाली सामंत,वैशाली माडे,त्यागराज खाडिलकर,स्वप्नील बांदोडकर,अमोल बावडेकर,गायिका उत्तरा केळकर आदी दिग्गज कलावंतासोबत कलेचं नावीन्य गायक अतुल दिवे यांनी जोपासलं आहे.
अतुल दिवे हे गझल गायक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत,गझलांचे अनेक कार्यक्रम ते संपूर्ण भारतभर करत असतात "खयाले गझल " हा त्यांचा उर्दू गजल आजचा कार्यक्रम असून "नजाकत" हा त्यांचा संपूर्ण मराठी गझलांचा कार्यक्रम त्यांनी रचला आहे; त्यांचे अनेक अल्बम प्रसिद्ध आहेत.तसेच माझ्या श्वासात तू ....चांदणं उन्हातलं.... गझल बोलते तेव्हा.... असे अनेक स्वरचित कार्यक्रम देखील आहेत. औरंगाबाद येथे त्यांचा ए एम डी नावाचा रेकॉर्डिंग स्टुडिओ देखील आहे. अत्यंत अद्यावत अशी यंत्रणा या स्टुडिओत आहे.तसेच 'स्वरसाक्षी" संगीत साधना केंद्र या नावाने त्यांची संगीत अकॅडमी सुद्धा आहे. अनेक नवनवीन गायक व गायिका यांना "अतुल दिवे"यांनी चित्रपट अल्बम व टीव्ही मालिकांमध्ये संधी दिलेली आहे.
