फीट इंडिया अंतर्गत शारीरिक क्षमता वाढविण्याचे ध्येय-
----प्राचार्यकर्नल एस ए वरदन
लाहोटी स्कुलमध्ये स्वस्थ भारत शालेय सप्ताह
लातूर:येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कुलमध्ये नुकताच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्वस्थ भारत शालेय सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर राबवलेल्या फीट इंडिया अभियानांतर्गत "स्वस्थ भारत शालेय स्पताहाचे आयोजन राजा नारायणलाल लाहोटी स्कुलमध्ये करण्यात होते. या सप्ताहाचे उद्घाटन प्राचार्य एस ए वरदन यांच्या हस्ते करण्यात आले.
या अंतर्गत स्कूलमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची शारिरीक क्षमता चाचणी घेण्यात आली. यात धावणे, ब्रिक बॅलन्सिंग, एकाग्रता, सिटप्स, अल्टरनेट लाईन टच, अशा अनेक शारिरीक क्षमता चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते.
‘हम फीट तो इंडिया फीट' याप्रमाणे सुदृढ आणि स्वस्थ व शारीरिक क्षमता असणारे कर्मचारीच संस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावण्यास मोलाचे योगदान देतात. यासाठीच प्रत्येक घटक तितकाच सक्षम असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य कर्नल एस ए वरदन यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
स्वस्थ भारत शालेय सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक क्षमता चाचणी मध्ये स्कूलच्या सर्व शिक्षक व कर्मचार्यांनी सहभाग घेतला.



