राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान व कोरोना योद्धा पुरस्कार
लातूर: कोरोना काळामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगले काम केले आहे अशांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार दिला जातो यामध्ये औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख यांचे नक्कीच काम चांगले असून आज त्यांना माझ्या हाताने पुरस्कार देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे.मी जरी भाजपचा असलो तरी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांना त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून पत्रकार संघाचा पुरस्कार देताना मला नक्कीच आनंद होत आहे. प्रत्येक राजकारण्यांमध्ये ही सोहर्दा असली पाहिजे,असे मत औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ.स्वाती फेरे यांनाही कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा औसा व नगर परिषद औसा यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिर व कोरोना योद्धा पुरस्कार औसा येथे नगर परिषद सभागृहात घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर औसा मतदार संघाचे आ.अभिमन्यू पवार, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी चव्हाण, नगराध्यक्ष अफसर शेख, तालुका अध्यक्ष आसिफ पटेल पटेल, संतोष मुक्ता, पोलीस निरीक्षक ठाकूर आदी उपस्थित होते.
पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक देडे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाची भूमिका विशद करून रक्तदात्यांना व कोरोना योध्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नगराध्यक्ष अफसर शेख यांनी पुरस्काराला उत्तर देत असताना म्हणाले की,आई-वडिलांच्या पुण्याईमुळे व त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे मी आज जनतेची सेवा करत असून पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता असून माझ्याकडून कोरोना काळामध्ये झालेले काम मी असेच अविरत काम करीत राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आसिफ पटेल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

