Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आमदार अभिमन्युजी पवार यांची गंगापुरला भेट, फ्लिटर उद्घाटन व सभागृह भुमिपुजन, विकास कामाची पाहणी व ग्रामपंचायत कामाचे कौतुक

 आमदार अभिमन्युजी पवार यांची गंगापुरला भेट, फ्लिटर उद्घाटन व सभागृह भुमिपुजन, विकास कामाची पाहणी व ग्रामपंचायत कामाचे कौतुक






आमदार अभिमन्युजी पवार यांनी काल गंगापुर येथे सदिच्छा भेट दिली, त्यांच्या हस्ते गावातील तिसरे व चौथ्या आर वो फिल्टर चे उद्घाटन करण्यात आले. गावात मागील तीन वर्षातील हे तिसरे व चौथे पाणीशुध्दीकरण केन्द्र ( वाॅटर फिल्टर ) असुन आज पासुन गंगापुर गावकरी यांच्या सेवेत ग्रामपंचायत मार्फत चालु करण्यात आले. सोबत सुतार समाजाच्या सभागृहाचे भुमीपुजन ही केले. 

जिल्हा परीषद सदस्य व गटनेते महेश पाटील हे ही सोबत होते, पुर्वीचे दोन पाणी शुध्दीकरण केन्द्र, शेततळ्यातुन होणारे पाण्याचे नियोजन, नाला सरळीकरण, मुख्य रस्ता व विद्युतीकरण, ग्रामपंचायत कर भरणाऱ्यास वर्षभर मोफत दळण, दररोज २० लिटर पाण्याचा १ झार व मिरची कांडप द्वारे मिरची वाटुन मिळणार या योजने ची माहिती, ट्रॅक्टर खरेदी ची माहिती, स्मशानभुमी मधील व्यवस्था, दलित वस्ती वस्ती व अल्पसंख्यांक वस्ती विकास योजना मधील कामांची माहिती, कोरोना विषयक उपाययोजना व खबरदारी, प्रत्येक शेतकरी यांचा शेतीमाल ग्रामपंचायत फक्त दोनशे रुपयेमध्ये घरपोच करते अश्या गावातील योजना व एकुण विकासकामाची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. गंगापुर सोसायटी चे चेअरमन हणमंतराव खंदाडे गुरुजी यांच्या हस्ते आमदार अभिमन्युजी पवार यांचा सत्कार करण्यात आला, गंगापुर हे महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणुन पुढे येत आहे, येथे होत असलेल्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. शेतरस्ते मोकळे करणे, जनावरासाठी गोठा देण्याच्या व सौर उर्जा चे वापर ग्रामपंचायतने करावा सुचना दिल्या,  सरपंचाने मनावर घेतल्यावर कसा विकास होऊ शकतो हे बाबु खंदाडे दाखवुन दिले असुन व आदर्श गाव तयार केले याचे उदाहरण आम्ही सर्व कडे देऊ असे गौरव उद्गागार व्यक्त केले. गंगापुर चा मुख्य रस्ता पाहिल्यावर लातुर शहरात असल्या वाटते जणु काही लातुर शहरातील औसा रस्त्यावर फिरत आहोत असे वाटते, गावातील सर्वच रस्ते याचे रुंदीकरण ही छान वाटले असे गौरव उद्गागार व्यक्त केले.  यथाशक्ती गंगापुर च्या विकासाठी मदत करु असे आपल्या भाषणातुन सांगितले.

या प्रसंगी सोसायटी चे चेअरमन हणमंतराव खंदाडे गुरुजी, व्हाईस चेअरमन सुग्रीव वाघे, सरपंच बाबु खंदाडे, पंचायत समिती अरविंद सुरकुटे, उपसरपंच रफीक शेख, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मिंड, ईश्वर शेलार, चाॅंद शेख, सतिष धोत्रे, सिंकदर शेख, नारायण दहीवाले, विनोद दंडीमे, प्रल्हाद गायकवाड आदिजण प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post