शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे सांगवी घुग्गी येथे 26 जानेवारी रोजी ध्वजारोहन कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व प्रशासक यांची अनुपस्थिति
तर तंटामुक्ती अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहन
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे सांगवी घुग्गी येथे 26 जानेवारी 2021 या बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक माडी व प्रशासक मंडवले हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हतेतसेच नुकत्याच ग्रामपंचायत च्या निवडणुका पार पडल्यामुळे सरपंच पद हे रिक्त आहे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजला जाणारा प्रजासत्ताक दिन असून सुद्धा वर नमूद दोन्ही अधिकारी कायद्याची पायमल्ली करून ध्वजारोहणाची कुठलीही नोटीस ग्रामपंचायत वर न अडकवता ध्वजारोहण कार्यक्रमास अनुपस्थित राहिले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला व ध्वजारोहण वेळेवर झाले नाही अशा प्रकारची तक्रार तहसीलदार यांच्याकडे लेखी केली आहे= ग्रामसेवक व प्रशासक हे दोन्ही अधिकारी ध्वजारोहणास उपस्थित राहिले नाहीत हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमान असून या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांना निलंबित करण्यात यावे असे ह्या अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे यावर शिरूर आनंतपाळ तहसीलदार अतुल जटाळे यांच्याशी संपर्क साधला असता गटविकास अधिकारी आणि चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात कळवण्यासाठी सांगण्यात आल्याचे त्यांनी दैनिक सामना शी बोलताना सांगितल: ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करून घेतली असून दोन गावचा पदभार आमच्याकडे असल्यामुळे आम्ही उपस्थित राहू शकलो नाही आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा जीआर आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले
