उस्मानाबाद जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना कास्ट्राईब संघटनेने दिले
उस्मानाबाद जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन सध्या उशीराने आदा करण्यात येत आहे. यापूर्वीच्या तीन-चार जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिल्यानंतरच त्या त्या महिन्याचे वेतन आदा करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांनी विविध बँक, पतसंस्था यांच्याकडून लाखो रुपयाचे लोन घेतले आहेत ते फेडण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे वेळेत एक तारखेला वेतन देण्यात यावे अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी सतीश कुमार ,उपाध्यक्ष सुधीर जाधवर,अध्यक्ष बापू शिंदे यांनी केली आहे.
