उत्तर प्रदेश सरकार व पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध!
लातुर दि.१०.०१.२०२१ उत्तर प्रदेशात माजी सरकारी वकीलांना पोलिस कारवाई करतांना ड्रेस कोडवर अमानुषपणे मारहाण करून व बुटांनी लाथाडुन ओढत नेतांनाचा व्हीडीओ दोन, चार दिवसांपासून समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे. यातून वकिली व्यवसाय करणाऱ्यांची नाहक बदनामी होत आहे.
वकील व्यवसाय व परंपरेला स्वातंत्र्य पूर्व काळापासून उज्जवल परंपरा आहे, प्रत्येक क्षेत्रात वकिलाचा आदर्शवत कार्य राहीलेले आहे.
पोलीस, वकील यांनी एकत्रित येत एकमेकांचा आदर व सन्मान ठेवत व्यवस्थेत राहून कार्यरत राहीले पाहीजे
आज स्थितीला वकीलांवर पक्षकार कींवा त्यांचे नातेवाईकांन मार्फत हल्ले होण्याचे प्रमाण वाढते आहे, पोलीस हुज्जत कींवा वकीलांच्या अंगावर हात टाकण्याच्या दुर्दैवी घटना घडतच आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये अश्या प्रकारे माजी सरकारी वकील /अधिवक्ता यांना जनावरांप्रमाणे मारहाण करण्याची दुर्दैवी घटना घडणे व ती ही उत्तर प्रदेश पोलिसांकडुन होणे अत्यंत चुकीचे व निषेधार्थ आहे याचा लातुर जिल्हा काँग्रेस कमिटी विधी विभागाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत
अश्या प्रकारच्या चुकीच्या घटना देशात व महाराष्ट्रात घडु नये व वकिलांना व कुटूंबियांना ही डॉकटर्स संरक्षण कायद्याप्रमाणे वकिलांना ही अँडव्होकेट्स संरक्षण कायदा लागु करण्या बाबत लातुर जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना अमित विलासराव देशमुख यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांना मागणी करण्यात येणार असल्याची माहिती लातुर जिल्हा काँग्रेस कमिटी विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगणे,अँड सचिन बावगे, अँड कैलास मस्के, अँड बालाजी बेडजवळगे, अँड अमर हत्ते, अँड पटेल, अँड अश्विन जाधव,अँड किशोर सूर्यवंशी,अँड सुधिर गुरव, अँड अरविंद देशमुख, अँड राहुल क्षीरसागर यांनी दिली आहे

