Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

14 वर्षीय मुलीला जबरदस्तीने घरातून उचलून नेवून सामूहिक बलात्कार

 



14 वर्षीय मुलीला जबरदस्तीने घरातून उचलून नेवून सामूहिक बलात्कार 

तुळजापूर/प्रतिनिधी/  रवी मुळे 

नळदुर्ग- दिनांक 29 जानेवारी: अणदूर ता तुळजापूर येथील एका अल्पवयीन मुलींवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हा प्रकार घडला आहे .या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .

गावातील  तिघांनी पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी राहत असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. आरोपींनी जबरदस्तीने तिच्या घरात शिरले . ते मुलीला बळजबरीने घरातून उचलून घेऊन गेले.त्यानंतर त्यांनी पिडीतेवर सामूहिक बलात्कार केला . या संतापजनक घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली . याप्रकरणी पोलिसांनी दोघा नराधमाला अटक केली आहे . तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी पोस्को कायदा अंतर्गत आणि कलम ३६३,३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना याप्रकरणातील तीन आरोपी पैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे .तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post