Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

खा सुधाकरराव शृंगारे यांची रुग्णसेवा सदनला ११लाखाची देणगी

 खा सुधाकरराव शृंगारे  यांची रुग्णसेवा सदनला ११लाखाची देणगी




लातूर दि.११( प्रतिनिधी ): येथील रुग्ण सेवा सदन उभारणीसाठी लातूरचे  खासदार   सुधाकरराव शृंगारे  यांच्या वतीने   रुग्णसेवा सदनच्या एका डॉरमेट्रीची  व्यक्तिगत देणगी रु ११ लाख रुपये  पद्मभूषण  डॉ अशोकराव  कुकडे काका यांचेकडे सुपुर्द केली.

      कर्करोग रुग्णांना लातुरात मिळत असलेले योग्य उपचारमुळे धोका कमी झाला असला तरी रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक आहे. या रुग्णांची विवेकानंद कँसर हॉस्पिटलमध्ये रेडिएशन व केमोथेरपी सोय आहे त्यासाठी रुग्णांना साधारण ८ ते ३० दिवस दररोज उपचारासाठी एक तासासाठी यावे लागते.असे १०० च्या वर दररोज रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या रुग्णांची ये जा करण्यात होणारी हेळसांड थांबवण्यासाठी  लातूरचे सुपुत्र व टाटा कँसर हॉस्पिटलचे संचालक  डॉ कैलास शर्मा यांनी  कृषिभूषण  बी बी ठोंबरे यांच्याकडे मांडला व त्यांनी जलयुक्त लातूरच्या टीम  समोर  मांडला व  एक भव्य"रुग्णसेवासदन"लोकसहभागातून बांधण्याचा संकल्प केला , विवेकानंद रुग्णालयाच्या अंतर्गतच रुग्णसेवा  सदन समितीच्या माध्यमातून हे कार्य चालू असून १५० रुग्ण व प्रत्येकी एक नातेवाईक यांची निवास व भोजन व्यवस्था नाममात्र दरात  करण्यात येणार आहे .
    यासाठी MIDC येथील  विवेकानंद  कँसर हॉस्पिटल शेजारी दोन एकर जागा MIDC कडून घेतली असून , या प्रकल्पात  १२ डॉर्मेटरी  २४ जनरल रूम  व ३६  स्पेशल रूम असणार आहेत  . या बरोबरच  एक अत्याधुनिक  यंत्रणा असलेले  २५०० स्क्वेअर फुट चे सभागृह   व १५००  स्क्वेअर फुट चा भोजन कक्ष  असणार आहे .  या प्रकल्पाचे  तीन मजली बांधकाम ८००००  स्क्वेअर फिटमध्ये होणार आहे.  एक एकर  जागा  बाग बगीच्या यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे . प्रकल्पासाठी अंदाजे ९ कोटी रु खर्च येणार असून हा सर्व निधी लोकसहभागातून उभारला जाणार आहे . समाजातून यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून बांधकामही प्रगती पथावर असून पुढील आठवड्यात पहिला स्लॅब टाकला जाणार आहे .
सध्या अशी व्यवस्था ११ रुग्णाची एका छोटया इमारतीत चालू आहे.  आज या कामाची पाहणी करून  लातूरचे लोकप्रिय खासदार  सुधाकरराव शृंगारे यांनी एका डॉरमेट्रीचा खर्च व्यक्तिगत निधीतुन  रु  ११ लाख रुपयाचा धनादेश  रुग्णसेवा सदनचे प्रकल्प समन्वयक पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांच्याकडे   दिला . यावेळी   शरदचंद्र परचुरे ,  अनिल अंधोरीकर,रुग्णसेवा सदनचे सहसचिव  शिवदास मिटकरी  उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post