Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मनपाच्या वतीने शहरात धूरफवारणी साथरोगांना अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

 मनपाच्या वतीने शहरात धूरफवारणी

साथरोगांना अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजना 





लातूर/प्रतिनिधी: कोरोनासारख्या महाभयंकर आजारातून बाहेर पडत असताना पुन्हा डेंग्यू, चिकन गुनिया व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी महानगरपालिकेच्या वतीने घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात धूर फवारणी केली जात आहे.
  लातूर शहराला स्वच्छ,सुंदर आणि हरित करण्याचा विडा महानगरपालिकेने उचलला आहे.त्यासाठी शहरातील सर्व मुख्य रस्ते,अंतर्गत रस्ते आणि प्रभागातील विविध रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता केली जात आहे. घरोघर जाऊन ओला व सुका कचरा वर्गीकरण करून स्वीकारला जात आहे.घंटागाडीच्या माध्यमातून कचरा डेपोवर पोचवला जात आहे असून निम्म्याहून अधिक कचऱ्यावर प्रभागातच प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जात आहे.शहर हरित करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन सुरू आहे.
   शहरातील अस्वच्छता कमी झाल्यामुळे साथरोगांना अटकाव घालण्यात यश आलेले आहे. असे असले तरी शहरातील डासांचा प्रादुर्भाव वाढू नये आणि त्या माध्यमातून साथरोगांना निमंत्रण मिळू नये यासाठी महापालिका दक्षता घेत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला तर डेंग्यू, चिकन गूनिया, मलेरिया यासारखे आजार डोके वर काढतात, ते होऊ नये यासाठी शहरात घरोघर धूर फवारणी केली जात आहे. धूर फवारणी यंत्रांच्या सहाय्याने प्रत्येक घर आणि परिसर तसेच खुल्या जागातही फवारणी सुरू आहे.
  पुढील काही दिवसात घरोघर फवारणी केली जाणार आहे. मनपाचे कर्मचारी फवारणीसाठी आले असता नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. शहराला साथरोगांपासून दूर ठेवण्यासाठी धूर फवारणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या
वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post