पोलीस अधीक्षकांनी केली विशेष पथकात खांदेपालट
लातूर/प्रतिनिधि
अवैध धंद्यावर करडी नजर ठेवण्यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक आणि तयार केलेल्या विशेष पथकात आता फेरबदल करण्यात आले आहेत.या पथकातील कर्मचार्यांना त्यांच्या मुळ पदावर पाठविण्यात आले आहे. तर या पदाची धुरा नव्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सोपविण्यात आली आहे पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारताच निखिल पिंगळे यांनी नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुरुंदकर यांच्या नेतृत्वाखाली अकरा जणांची विशेष पथक तैनात केले होते, परंतु अल्पावधीतच या
पथकात खांदेपालट करण्यात आली असून या अकरा जणांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठविण्यात आले आहे. असे आदेश पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नुकतेच काढले आहेत. या पथकाची धुरा आता निलंगा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे या पथकात बालाजी अटरगे, बळवंत भोसले, भिमराव हासुळे, लक्ष्मण कांदे, दिनेश हवा ,प्रमोद मोरे आणि परमेश्वर अंकुलगे यांचा समावेश करण्यात आला आहे
