Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कॉंग्रेसचे माध्यम जिल्हा अध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

कॉंग्रेसचे माध्यम  जिल्हा अध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

लातूर दि 29.




प्रदेश कॉंग्रेसच्या सुचनेनुसार जिल्यातील कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत विविध विभागाच्या  जिल्हाध्यक्ष पदाच्या  निवडी केल्या असुन त्यात  माध्यम(मीडिया) विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार हरिराम कुलकर्णी यांची सलग दुसर्यान्दा  निवड करण्यात आली आहे त्या बद्दल त्यांचा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 


यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस आर देशमुख,रेणा साखर कारखान्याचे चेअरमन यशवंतराव पाटील,मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे,जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ,संचालक नाथसिंह देशमुख, कॉंग्रेस सेवा दलाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुपर्न जगताप, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले,जिल्हा अल्पसंख्याक कॉंग्रेस चे माजी अध्यक्ष सय्यद रफिक.मिडिया सेलचे  विजय कदम,अल्ताफ शेख,रेणा चे संचालक प्रविण पाटील, संभाजीराव सुळ,प्रमोद जाधव, चांदपाशा इनामदार, आदी मान्यवर उपस्थित होते 


------'

कामाची कॉंग्रेस पक्षाने पावती दिली

हरिराम कुलकर्णी यांचे मनोगत 

लातूर शहर व जिल्यात कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या  जवाबदारी व कॉंग्रेस पक्षाचे विचार, प्रचार व प्रसार  माध्यमात व सोशल मिडिया च्या अंतर्गत घेवुन लोकात ग्रामीण भागापर्य्ंत घेवून  जाण्याचे कार्य नेत्यांच्या मार्गदर्शना खाली केले असुन कॉंग्रेस पक्षाने  9 वर्षात शहर मिडिया अध्यक्ष, जिल्हा सोशल मिडिया संस्थापक  अध्यक्ष,जिल्हा कॉंग्रेस माध्यम समन्वयक अशी पद दिली त्या पदाला शोभेल असे काम करण्याचा प्रयत्न मी  केला असुन जिल्हा परिषद,लोकसभा,विधानसभा,महापलिका निवडणुकीत माध्यम  विभागाची जवाबदारी मी प्रामाणिकपणे  सांभाळली आहे त्याचीच ही पावती म्हणून दुसर्यान्दा जिल्हा कॉंग्रेस माध्यम जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख,पालकमंत्री नामदार अमित देशमुख,आमदार धिरज देशमुख यांनी निवड करुण कामाची पावती  दिली आहे असे यावेळी नुतन कॉंग्रेस माध्यम विभागाचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांनी यावेळी  बोलताना  सांगितले.


जिल्यात लवकरच तालुका पातळीवर माध्यम पदाधिकारी नेमून कॉंग्रेस पक्षाचे कार्य व केलेल्या विकास कामांच्या  कार्याचा लेखाजोगा लोकापर्य्ंत घेवुन जाण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post