Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये संस्थाचालकाची दादागिरी...जिल्हापरिषद येथे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी संस्थाचालका विरूद्ध गुन्हा दाखल

 लातूर मध्ये संस्थाचालकाची दादागिरी....

जिल्हा परिषद येथे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

 लातूर/प्रतिनिधि



 जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधीक्षक वर्ग-2 यांना शाळेचा अहवाल अनुकूल दिला नसल्याचा राग मनात धरून एका संस्थाचालकाने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी  शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक वर्ग-2 राजेंद्र ढाकणे यांनी तक्रारीत म्हटले आहे की सकाळी कार्यालयात काम करीत असताना घोनसी येथील व्यंकटेश बहुउद्देशीय संस्थेची संस्थाचालक शिवाजी व्यंकटराव परगे अचानक आढावा करीत माझ्या केबिनमध्ये घुसले शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून आले माझ्या दंडाला कामावरून खुर्ची सहा खाली पडले यावेळी शिक्षण विभागाच्या अधीक्षक कार्यालयात अचानक सुरू झालेल्या गोंधळ पाहून मी चक्रावले कार्यालयातील सहकाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अधिक गोंधळ सुरू केल्याने मला केबिनच्या बाहेर घेऊन गेले यासंदर्भात प्रभारी शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांना हल्ल्याबाबत ची माहिती दिली लातूर पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक म्हणून कार्यरत असताना अधिक्षक वर्ग-2 अतिरिक्त कारभार माझ्याकडे होता त्यावेळी बोगस तुकड्या प्रकरणी अहवालाची कामे मी तात्काळ अधीक्षक वेदन  प्रथम शिक्षणाधिकारी प्राथमिक असे एकत्रित काम केले त्यावेळी संस्थाचालक शिवाजी पारगे यांनी दबाव टाकून अनुकूल अहवालासाठी दबाव टाकला होता त्यांच्या दबावाला न जुमानता अहवाल तयार केला त्या अहवालावरून त्यांच्या संस्थेच्या बोगस तुकडे शासनाने कायम  अनुदानित केल्या आहेत.तसेच शासनाने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यावेळी  त्यांनी मला बघून घेण्याची धमकी दिली अनेकदा त्यांची खोटी कामे न केल्याने माझ्यावर राग मनात धरून कार्यालयात घुसून हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संस्थाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post