उद्या शैक्षणिक महाराष्ट्र बंद
लातूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने ११ डिसेंबर रोजी काढलेला अद्यादेश रद्द करावा व अनुदान पात्र शाळांना अनुदानाची तरतूद करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी शुक्रवार, दि. १८ डिसेंबर रोजी शैक्षणिक महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
लातूर विभागातील नांदेड, उस्मानाबा द व लातूर जिल्ह्यातील सर्व संस्थाचालकांनी शिक्षकेतर कर्मचार्यांची पदे रद्द करण्याबाबतचा अद्यादेश मागे घ्यावा व अनुदानाची तरतूद करावी तसेच सर्व शाळांना वेतनेतर अनुदान अदा करावे म्हणून बंदमध्ये सर्व संस्थाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार, सचिव बाबूराव जाधव, कोषाध्यक्ष डी. एन. केंद्रे, ओमप्रकाश साकोळकर, प्रा. गोविंदराव घार, डी. बी. लोहारे गुरुजी, मधुकर पात्रे, जब्बार सगरे, प्रभाकर बंडगर, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव बजरंग चोले, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग देडे, सचिव पांडुरंग चिंचोलकर आदींनी केले आहे.