Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सिनेट सदस्य प्रा डॉ ज्ञानदेव मोरे यांचा आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने सत्कार

 सिनेट सदस्य प्रा डॉ ज्ञानदेव मोरे यांचा आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने सत्कार



लातुर दि.१६.१२.२०२० स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे सिनेट सदस्य प्रा डॉ ज्ञानदेव मोरे लातुर येथे आले असता आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

लातुर येथील विद्यापीठ उपकेंद्र येथे लोकनेते विलासराव देशमुख अध्यासन व संशोधन केंद्र सुरू करण्या बाबत चा ठराव मंजूर करून घेतला आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने उच्च तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना  अध्यासन व संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी ५५ कोटी रुपये अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे

लातुर येथे विलासराव देशमुख अध्यासन व संशोधन केंद्र सुरू झाल्यास,लातूरच्या वैभवात भर पडून,लातुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन व चालना भेटणार आहे,लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातूनच विद्यार्थी व पालक, कर्मचाऱ्यांच्या सोई व्हावी या हेतूने विद्यपीठाचे उपकेंद्र लातुर पेठ येथे २००७ मध्ये सुरू करण्यात आले आहे

लोकनेते विलासराव देशमुख अध्यासन व संशोधन केंद्र सुरु झाल्यास लातूरला स्वतंत्र विद्यापीठ होण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे

या वेळी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीचे मुख्य संयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे, श्री धनराज जोशी, अँड अजय कलशेट्टी, श्री ताहेरभाई सौदागर, श्री प्रा डॉ मछिचन्द्र खंडागळे, श्री सुनील खडबडे, श्री दत्ता आळदकर,प्रा स्वामी आदी उपस्थित होते

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post