Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

घनकचरा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणी साठी.... सम्राट मित्रमंडळाचे मूंबई आझाद मैदान येथे धरणे निदर्शने अंदोलन

 घनकचरा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणी साठी....

सम्राट मित्रमंडळाचे मूंबई आझाद मैदान येथे धरणे निदर्शने अंदोलन

मूंबई दि.15 




घनकचरा व्यवस्थापनावर काम करणार्या कंत्राटी कामगारांना शासनाने शासकीय सेवेत कायम करावे ही मागणी घेवून सम्राट मित्रमंडळाच्या वतीने आज आझाद मैदान मुंबई येथे धरणे व निदर्शने अंदोलन करण्यात आले.


युवक नेते डाॅ सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सदरचे अंदोलन करण्यात येवून नगरविकास विभागाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात पूढे म्हटले आहे की,सर्वत्रच घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला अहताना यात काम करणार्या कामगारांच्या हिताकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. घनकचरा व्यवस्थापनावर कार्यरत महीला व पुरूष कामगारांना शासकीय सेवेमध्ये समावून घेण्यात यावे.

अहमदपूर नगर परिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत महिला व पुरुष कंत्राटी स्वरूपामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कामावर आहेत.प्रत्येक वर्षी घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्याने निविदा काढल्या जातात.ज्या कंत्राटदाराला निविदा मंजूर होते त्या कंत्राटदारा मार्फत गेल्या पंधरा वर्षापासून संबंधीत कामगार काम करत आहेत.तसेच दिलेल्या तुटपुंज्या पगारा वर आज ना उद्या आपण नगर परिषद आस्थापनेवर कायम होवून जाईल या आशेवर सदरील कामगार काम करून आपली उपजीविका भागवत आहेत.

भविष्यातील नगरपरिषदेच्या आस्थापनेवर होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये गेल्या पंधरा वर्षा पासून काम करत असलेल्या सर्व महिला व पुरुष कामगारांना नगरपरिषदेच्या शासकीय सेवेमध्ये विशेष बाब म्हणून प्राधान्याने भरती करून घ्यावे.


या अंदोलनात सामाजिक कार्यकर्ते जिवनराव गायकवाड,अनिल मूसळे,सिताराम राठोड,देविदास ससाणे,भैय्या भालेराव,जिलानी शेख,किरण वाघमारे,राणी गायकवाड,अनिता कांबळे,रेखा गूळवे,चांगूणाबाई जाभाडे आदी कामगारांची उपस्थिती होती.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post