पोलिसांची सावळेश्वर टोल नाक्यावर मोठी कारवाई ! विशाखापट्टणमहून आटपाडीला जाणारे तीन कोटींचे सोने जप्त
सोलापूर /प्रतिनिधि: विशाखापट्टणमहून आटपाडीला जाणाऱ्या कारमधून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती रविवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावळेश्वर टोल नाक्यावर संबंधित कार (डब्ल्यूबी 02 - एपी 1596) आली असता रात्री 10 वाजता पोलिसांनी ती अडवली. त्यात कारचालक व अन्य एकजण होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारण उत्तरे दिली नाही. गाडीत काहीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता चालकाच्या सीटखाली लॉकर असल्याचे आढळून आले. ते उघडून पाहिली असता त्यामध्ये एक किलोप्रमाणे सहा सोन्याची बिस्किटे मिळून आली.

