अहमदपूरात बालाघाट प्रिमिअर लिग चा समारोप
रोहन क्लब लातूर विजेता तर मैक्झिम क्रिकेट अॅकॅडमी शिरूरताजबंद उपविजेता
अहमदपूर दि.10
येथील जिल्हा परिषद मैदानावर गेल्या दहा दिवसा पासून सूरू असलेल्या बालाघाट प्रिमियर लीग चा आज समारोप झाला.लातूर येथील रोहन क्रिकेट क्लब हा विजेता ठरला तर मॅक्झिम क्रिकेट क्लब शिरूरताजबंद हा उपविजेता ठरला.
आज या प्रिमियर लिग च्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अॅड.रवी भूरकापल्ले होते तर बक्षीस वितरक म्हणून यूवकनेते डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून पोलिस उपनिरिक्षक नागोराव जाधव,सामाजीक कार्यकर्ते जीवन गायकवाड आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात रोहन क्लब लातूर चा विजय झाला.
या वेळी रोहन क्रिकेट क्लब लातूर यांना प्रथम पूरस्कार म्हणून स्मृतीचिन्ह रोख रक्कम द्वितीय बक्षीस म्हणून मॅक्झिम क्रिकेट क्लब शिरूरताजबंद यांना स्मृतीचिन्ह,रोख रक्कम तसेच प्लेअर ऑफ द सिरिज हे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या स्पर्धचे आयोजन यूवा कार्यकर्ते रुपेश कांबळे व आनंद जंगले यांनी केले होते.यावेळी प्रदिप मोरे, अजय तात्तापुरे, जयेश कांबळे, मिथुन शिंदे , बालाजी जगताप, महेश बिलापट्टे, मोहित परमार,सचिन बानाटे आदींची उपस्थीत होती.