सिंचन भवन परिसरात स्वछ पाणी पुरवठा सुरु करून उपविभागा समोर वृक्ष लागवड व सुशोभिकरण
लातूर-सिंचन भवन व परिसर येथे स्वछ पाणी पुरवठा सुरु करून,येथील परिसरात व उपविभागा समोर वृक्ष लागवड व सुशोभिकरण केले. त्यामुळे या पाण्यामुळे जिवंतपणा जाणवत आहे,तसेच या परिसरात दोन स्वच्छतागृहे असुन ते पाणी नसल्यामुळे बंद होती, ती आता चालू राहणार आहेत....
यासाठी कार्यकारी अभियंता श्री.अभिजीत नितनवरे यानी जातीने लक्ष घालून हे काम करुन घेतले असुन यावेळी मा.उप कार्यकारी अभियंता श्री योगिराज माने,उप अभियंता श्री एस जी कोन्गे,शाखा अभियंता श्री नितीन बी.पाटील व बी आर घोडके यांच्या उपस्थीत पुरवठा सुरु केला आहे.याबद्दल सर्व जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यानी या वेळी आनंद व्यक्त केला आहे.
योगिराज माने..यांची प्रतिक्रिया
सुप्रसिद्ध हिंदी कविच्या चार ओळी आहेत...
आज नहीं तो कल निकलेगा..
हर मुश्किल का हल निकलेगा....
हिंमत कर के जोर लगाओ..
चट्टानों से जल निकलेगा.....
या ओळी सार्थ ठरविण्याचे काम मा.सुधाकर कोंगे यांचे नेतृत्वाखाली आमचे मित्र मा.नितीन पाटील यांनी केले आहे...पाटबंधारेच्या कार्यालयीन परिसरात पाण्याचे तुषार पाहून माझ्या कविमनाला झालेला आनंद शब्दातीत आहे...
श्री.कोंगे ..नितीन पाटील व त्यांचे सहका-यांचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन 💐💐
आपल्या हातून पाटबंधारेचा परिसर सदैव हिरवा होवो..हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏