Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपाच्या वीज बिल होळी आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपाच्या वीज बिल होळी आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रतिनिधी/महादेव पोलदासे



 


लातूर/प्रतिनिधी: कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजबिले देऊन लुबाडणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनास लातूरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.







    कोरोनामुळे नागरिक आर्थिक व शारीरिक संकटात सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गहन झाला आहे.अशा स्थितीत नागरिकांना मदत करणे आवश्यक होते परंतु सरकारने मदत न करता लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवहार बंद असतानाही भरमसाठ वीजबिले पाठवली आहेत.घरगुती वापराच्या मीटरची बिले अधिक आलेली असून शेतीपंपाची देखील अवस्था यापेक्षा वेगळी नाही. वाढीव वीजबिले भरणे कठीण आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने वीज बिलांची होळी करून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

    लातूर येथे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात वीजबिलांची होळी करण्यात आली.या आंदोलनात संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार, प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी,मंगेश बिराजदार,

अजित पाटील कव्हेकर, स्वाती जाधव, रवी सुडे, संजय गिर, ललित तोष्णीवाल, ज्योतीराम चिवडे, मुन्ना हाश्मी, व्यंकटराव पन्हाळे, महेश कौळखेरे, मीनाताई भोसले, ॲड. अवचारे, ज्योती मार्कंडे, सुनिता उबाळे, आनंदी कदम, ललिता कांबळे, ज्योती रसाळे, रवी आलटे, पृथ्वीसिंह बायस, कमलाकर डोके, प्रशांत डोके, आफ्रीन खान, सुमन राठोड, संतोष तिवारी,अजय पाटील, महेश कोंडेकर, कासिम पठाण, मतीन शेख, अहमद हरणमारे,रियाज पठाण, मनोज सूर्यवंशी,सागर 

घोडके,किशोर जैन,श्रीराम गोमारे, विकास घोडके, परमेश्वर सगर,दत्ता कोम्पले, सौदागर पवार, वर्षा सूर्यवंशी, राज सोनवणे,पृथ्वीराज कुरे,

बाबासाहेब गायकवाड, बालाजी कांबळे आदींनी सहभाग नोंदवला.






Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post