Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सास्तूर अल्पवयीन बलात्कार प्रकरणी पू.अहिल्यादेवी होळकर सर्वांगिण विकास मंडळाचा तिव्र निषेध

सास्तूर अल्पवयीन बलात्कार प्रकरणी पू.अहिल्यादेवी होळकर सर्वांगिण विकास मंडळाचा तिव्र निषेध


 







लातर:- धनगर समाजाच्या अल्पवयीन बालिकेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी पु. अहिल्यादेवी होळकर सर्वांगिण विकास मंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत धनगर कुटुंबावर झालेल्या या अन्यायाचा तिव्र निषेध व्यक्त करीत या प्रकरणाची जलदगतीने कारवाई करुन दोषींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली.

ऍड. मा. गो. मांडुरके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत धनगर समाजावरील होणार्‍या अशा अन्यायाला अटकाव करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात शासनाला निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला. सास्तूर येथील या पिडीत कुटूंबाला ११ हजार रुपयाचे अर्थसहाय्य मंडळातर्ङ्गे देण्याचे निश्‍चित करुन अधिकची अर्थिक मदत वैयक्तिकरित्या करण्याचा मनोदय कार्यकारिणी सदस्यांनी व्यक्त केला. अडाणी आणि मोलमजुरी करुन जगणार्‍या या कुटूंबाला प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळण्यात दिरंगाईच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. 

प्रारंभी कार्यकारिणीच्या बैठकीत कोरोणा प्रादुर्भावाने दुःखद निधन झालेल्या कै. तात्याराव केसाळे (लातूर), कै. पिराजी महाका (नांदेड), कै. गंगाधरराव नेवरकर (नांदेड) या मंडळाच्या खुप क्रियाशील असलेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रतिवर्षी खूप भव्य स्वरुपात घेतला जाणारा राज्यस्तरीय धनगर समाज वधु- वर परिचय मेळाचा कोरोणा प्रादुर्भावामुळे अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला असुन कोरोणा आटोक्यात आल्यास शासन मान्यतेने मेळावा मार्च - एप्रिल २०२१ मध्ये घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या संदर्भात पुढील काळात धोरण निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती विषद करण्यात आली.

कार्यकारिणीच्या या बैठकीस सचिव ऍड. मंचकराव डोणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण धायगुडे, कार्यकारिणी सदस्य संभाजी सुळ, ऍड. बाबुराव बंडगर, सुभाष लवटे, गोविंद सुरवसे, भारत खंदारे, राम रोडे, सुजितकुमारवाघे, नवनाथ कवितके, गोपाळ सुरवसे, भारत माने आदिंची प्रमुख उपस्थिती होती.





 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post