Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्ह्यातील 11 कोविड केअर सेंटर रुग्ण नसल्याने तात्पुरते बंद

जिल्ह्यातील 11 कोविड केअर सेंटर रुग्ण नसल्याने तात्पुरते बंद                       -जिल्हाधिकारी  जी.श्रीकांत               


 कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे व  सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी


सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 909, तर उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18 हजार 663.


 *बंद केलेल्या कोविड केअर सेन्टर मधील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  सेवा संपुष्टात
लातूर, दि.26(जिमाका):- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून  उपचाराने बरे  होणार्याक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-19 अंतर्गत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर पैकी अनेक सेंटरमध्ये सद्यस्थितीत रुग्ण नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील 11 कोविड केअर सेंटर 26 ऑक्टोबर  2020 पासून पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.
         सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी च्या कोविड रिपोर्टनुसार 909 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यातील 482 रुग्ण हे शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित 427 रुपये गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटर मध्ये रुग्ण नाहीत अशी माहिती संबंधित कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निर्देश आणून दिली असल्याने ते अकरा कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.
* तात्पुरते बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर*
1) जयहिंद पब्लिक स्कूल, उदगीर 2) समज कल्याण वस्तीगृह, देवणी 3) संभाजी केंद्रे अध्यापक महाविद्यालय, जळकोट 4)समाजकल्याण वस्तीगृह, लामजना ता. औसा 5) जाऊ, निलंगा 6) समाज कल्याण वसतिगृह बावची ता. रेणापूर 7) मुलींची शासकीय निवासी शाळा, मरशिवणी अहमदपूर 8) बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज लातूर 9) दयानंद कॉलेज होस्टेल लातूर 10) शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, लातूर 11) पुरणमल लाहोटी मुला-मुलींचे वस्तीगृह, लातूर.


*कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात*
      Covid-19 साथरोग नियंत्रण उपचार करण्यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या अकरा कोविड केअर सेंटर मध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तरी दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पासून कार्यालयीन वेळेनंतर उपरोक्त सर्व 11 केअर सेंटर व त्या अंतर्गत नियुक्त केलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात येत आहेत. तथापि भविष्यात उपरोक्त केंद्र पुन्हा सुरू केल्यास सद्यस्थितीमध्ये कमी करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येणार आहे.


* कोविड संपलेला नसल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी*
        लातूर जिल्ह्यात माहे एप्रिल 2020 पासून ते दिनांक 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एकूण 19 हजार 960 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले यापैकी 18463 रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेले तर 588 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच सद्यस्थितीत 909 रुग्ण उपचार घेत आहेत यापैकी 482 रुग्ण हे विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 427 कोरोना बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. 
        मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा उपचाराने बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत रोज लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे रोजची बाधित रुग्णांची संख्या घटत चाललेली आहे.
   परंतु लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाची रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी कोरोना आजार पूर्णपणे संपलेला नाही याची जाणीव ठेवावी. तसेच शासन व प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नियमित तंतोतंत पालन करावे. त्यामुळे पुढील काही काळात लातूर जिल्हा हा पूर्णपणे कोरोना मुक्त होण्यास मदत होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे,  हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर पाळणे या मार्गदर्शक सूचनांचे नियमित पालन करावे व कोरोनाला दूर ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post