शेती कायद्या संदर्भात मा.आ. कव्हेकर यांचे व्याख्यान
लातूर दि.26
केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांला आर्थिक सुबकता व स्थिरता निर्माण करून देण्यासाठी विविध कृषी कायदे केले. या संदर्भात पी.व्ही.नरसिंगराव यांच्या कार्यकाळात मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार व पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंगजी यांच्या कार्यकाळात मॉडल अॅक्ट शेतीमाल व फळे, मार्केट यार्ड बाहेर विकण्याचे धोरण राबविण्याचा विश्वास काँग्रेस पक्षाच्या लोकसभा जाहीरनाम्यात दिलेला होता. असे असतानाही राजकारणासाठी कृषी कायद्याला विरोध करून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या कायद्यासंदर्भातील सत्य माहिती जनतेला, शेतकर्याला, कार्यकर्त्याला देण्याच्या सुचना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा साहेब व केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे “नवीन कृषी धोरण शेतकरी व देशाच्या हिताचे ” या विषयावर भाजपा नेते तथा माजी आ., कृषी अभ्यासक शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे व्याख्यान 29 ऑक्टोबर 2020 रोजी गुरूवारी सकाळी 10.30 वा. स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज सभागृह, एम.आय.डी.सी.कळंब रोड,लातूर येथे ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या व्याख्याणास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष गुरूनाथ मगे, शहर संघटक सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, मंडळाध्यक्ष ज्योतीराम चिवडे यांनी केले आहे.
फेसबुक लाईव्ह व्यख्यानाचे प्रसारण...
माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे कृषी कायदावरील व्याख्यान उद्या फेसबुक लाईव्हव्दारे प्रसारीत केले जाणार आहे.त्यामुळे फेसबुक लाईव्ह होणा-या व्याख्यानाचा लाभ भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते ,शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आलेले आहे.