कोविड 19 च्या काळात लातूर जिल्हा बँकेने घरपोच सेवा देवुन सामाजिक बांधिलकी जपली
जिल्हा बँकेच्या कर्मचारी व गटसचिव याना 21टक्के दिवाळीचा बोनस व कोविड 19 च्या काळात अधिक कामाचे बक्षीस म्हणून 1महिन्याचा पगार देणार
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची महत्वपूर्ण घोषणा
लातूर दि 28.
कोविड 19च्या कार्यकाळात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी, गटसचिव यानी शेतकरी,ग्राहक,जेस्ठ नागरीक यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांच्या गावात जावुन सेवा देण्याचे मोठे जिगरीचे काम जिल्हा बँकेने करित सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले असुन बँकेच्या कर्मचारी गटसचिव यानी अत्यावश्यक काळात केलेले काम म्हणून यावर्षी बँकेचे कर्मचारी, गटसचिव याना दिवाळीचा बोनस 21 टक्के व कोविड 19 च्या कार्यकाळात अधिक काम केल्याने 1 महिन्याचा जादा पगार दिवाळीचा बोनस म्हणून देणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी गुरूवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घोषना केली आहे जिल्यातील मांजरा परिवारातील साखर कारखान्या पाठोपाठ जिल्हा बँकेच्या कर्मचारी गटसचिवांना घसघशीत बोनस दिल्याने यावर्षीची दिवाळी परिवारातील कर्मचारी अधिकारी यांची गोड होणार आहे
गुरुवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या उपस्तीत बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांच्याअध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते
यावेळी बँकेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन शेतकरी, सभासद ,ग्राहकाना अधिक सुलभा सेवा देण्यासाठी पुढिल काळात योजनांची अम्बलबजावनी तसेच बँकेच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यानी यावेळी घेतला
या बैठकीला बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ,संचालक तथा आमदार बाबासाहेब पाटील,संचालक एस आर देशमुख, नाथसिंह देशमुख,भगवानराव पाटिल, संभाजी सुळ,एन आर पाटील,अँड प्रमोद जाधव,व्यंकटराव बिरादार,सुधाकर रुकमे,संजय बोरा,सौ स्वयंप्रभा पाटील,सौ शिवकन्या पिंपळे,जिल्हा उपनिबंधक समृत जाधव,कार्यकारी संचालक हनमंतराव जाधव उपस्तीत होते