Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सोलापूर-पंढरपूर येथील कुभार घाट येथे भिंत कोसळून 6 जण जागीच ठार

सोलापूर-पंढरपूर येथील कुभार घाट येथे भिंत कोसळून 6 जण जागीच ठार


सोलापुर प्रतिनिधी/ईमाम जमादार



दि.15 -पंढरपुरातील कुंभार घाट इथं अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


शनिवार-रविवारच्या पावसाची विक्रमी नोंद, दशकातील दुसरा सर्वाधिक पाऊस


परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळपासूनच आढावा घेणं सुरु केलं. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसंच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच, त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तालय, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वय राखण्यात यावा. आवश्यक त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसंच महसूल आणि वैद्यकीय अशा सर


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post