मन की बात,आणि बालवाडी
मी श्यक्यतो मन की बात ऐकतच नाही ,,
याचे कारण मी कुणाचा तिरस्कार करतो म्हणून नाही ,तर त्या संबधी माझ्या कांही धारणा आहेत म्हणून
आम्ही पूर्वी पंतप्रधान ,राष्ट्रपती यांना फक्त महत्वाचे निवेदन करतानाच ऐकले होते ,असे सहसा विना कारण ऐकले नव्हते
ज्या बाबी धीर गंभीर असत त्याच सांगण्या साठी ते अवतरत असत
15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय सण ,व त्या निमित्ताने राष्ट्रपतींचे संबोधन होत असे
याने अति परिचय होत नव्हता व त्या पदाचा आब ही राखला जायचा
*अतिपरिचय अवज्ञा*
असे त्या काळी सुभाषित होते बहुतेक आताच्या काळात ते लुप्त झाले असावे
माझा जन्म 1964 साल चा 62 चे युद्ध व त्यामुळे भारताची नाजूक झालेली अर्थव्यवस्था ,व त्यात ही अगोदरच आम्ही ज्या प्रवर्गात जन्माला आलो तो सातत्याने ह्याच स्वरूपाच्या हलाखी भोगत असलेला समाज ,घरचे असे सांगतात की मका सुद्धा मिळणे त्या काळात अवघड झाले होते ,,
आमच्या काळात नर्सरी ,बालवाडी असले प्रकार अस्तित्वात नव्हते ,5 वर्षाचे झाले की थेट जिल्हा परिषद शाळेत दाखल केले जायचे ,
त्यामुळे बालवाडीचे सुखाला मी किंवा आमच्या काळातील लोक पारखे झाले होते
हे सुख आम्हांला आमच्या माननीय पंतप्रधान मोदीजी नि मिळवून दिले या बदल त्यांची कृतज्ञाता व्यक्त करणे हे माझे आद्य कर्तव्य ठरते त्या प्रमाणे ही कृतज्ञता व्यक्त करतो
आज मीच नाही भारतातील प्रत्येक आबाल वृद्ध ही या बालवाडीतील विद्यार्थी आहे व ह्या विद्यार्थ्याला जड बौद्धिक देणे ,त्याला खऱ्या व गंभीर जबाबदाऱ्या व आव्हानांची ओळख करून देणे असे प्रकार जाणती माणसे करीत नसतात ,
ती त्या आव्हानाला आपल्या 56 इंच छातीने सामोरी जातात ती आव्हाने पेलतात ,कांही परतवून लावतात ,
3 वर्षे वयाच्या मुलाला तुम्ही कधी पाहिले आहे का ?जो बापाला त्यांच्या काळजीचे कारण विचारेल?
अगदी पोरसवदा वयात ही हे घडत नाही ,
आणि असे घडलेच तर ,तुला काय कळते?
मोठ्याच्या प्रश्नात नाक खुपसू नकोस ,खेळायला जा ,असे सल्ले मिळत
मला तर आता प्रश्न विचारण्याची ही भीती वाटते
माझ्या स्वप्नात ही
आमचे नेते अजितदादा येतात व त्यांचा तो डॉयलॉग बोलताना दिसतात
*तुझा अनुभव किती?*
*तू बोलतोस किती?*
*खासदार संजय जी राऊत साहेबाना ही भाजप वाल्यानी प्रश्न विचारला होता*
*तुमचा पगार किती?*
*तुम्ही बोलता किती?*
त्यात आम्ही तर
*बिन पगारी फुल अधिकारी*
या सदरात मोडणारे
व असलाच भरणा बहुतांश लोकांचा असल्या मुळे यांना काय म्हणून सीमेवर काय घडते वा काय घडले हे सांगावंयाचे?असा ही प्रश्न त्यांचे मनात असल्या मुळे बहुतेक ते सांगत नसावेत ,,
या ऐवजी छोटे छोटे उपक्रम बालके म्हणून त्यांचे पुढ्यात टाकली की त्या खेळण्याशी ते खेळत बसतात ,
म्हणून चिनी वस्तूवर बहिष्कार टाका,
स्वदेश प्रेमातून त्या वस्तू फोडून टाका किंवा जाळून टाका असे सुचवण्यात आले
नंतर कळले ,आम्ही जे जाळत आहोत त्या ही पेक्षा अधिक खोलीवर हा चिनी पसारा पसरलेला आहे ,,
अगदी पी पी इ किट पासून ते कोरोना टेस्ट किट पर्यंत ,,
आणि आम्ही जी औषधे खातो ना त्यातील 70 % बेस हा कच्चा माल म्हणून चीन चा असतो ,
हा बेस कसा काढून टाकायचा?हे ही आम्हांला ज्ञात नाही ,
अनेक मोटारी त वापरले जाणारे पार्ट ही चीन मधूनच आयात केले जातात असे ही वाचले आहे
त्यामुळे घड्याळे,गाड्या,औषधे ,हे सारेच फेकून द्यावे लागेल,
*राजा हरीचंद्र यांचा मुलगा रुईदास बाणेदार पणे म्हणतो* ,,
*बाबा तुमच्या धर्माचरणाच्या आड माझे पोट येणार असेल तर ते मी आता फेकून देत आहे*
तसे आम्ही ही म्हटले असते की
*राष्ट्र प्रेमाच्या आड येणारे हे चिनी वस्तू वरील प्रेम वा गरज आम्ही फेकून देत आहोत*
पण लगेच आठवले
*सैनिकांच्या अंगावरील बुलेट प्रूफ जॅकेट ही म्हणे चीनचे च आहे*
ही गोम अजून उलगडत नाही तोच असे ही लक्षात आले की ,
*आपल्या पंतप्रधान केअर फंडा त ही या चिनी कंपन्यांनी भरघोस असे दान केले आहे*
ते आपण कसे फेकणार?या बाबतीत
*आपण असमर्थ आहोत*
*59*
अँप आपण बंद केले ,ज्यातील 5 मुख्य एप वर अनेक वर्षांपासून आरोप होताच की हे एप भारतीयांचा डाटा चोरतात* ,,
या बंदी मुळे आपले भारतीय मन सुखावले ,,
आमच्यातील राष्ट्रवाद सुखावला ,
59 भागीले 20 शहीद जवान
असे गणित माडावे का ?हा बालसुलभ प्रश्न मी जाणत्यांना विचारत आहे
*पेटीयम ,पेटीयम मॉल्स snypdil बिगबास्केट ,झोमॅटो ,यासह* *फ्लिपकार्ड,ओला ,हाइक, मेडिकल बुकिंग साठी वापरले जाणारे(practo)*
*मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जाणारे बाय ज्युस*
*हेकोण फेकून देणार?व कसे?*
मोदीजी आल्या पासून भारतात चीनची गुंतवणूक 35000 कोटीच्या घरात भारतात झाली आहे
*चीन चे संरक्षक मंत्री म्हणाले होते*
*की आपल्या देशातील राष्ट्रवादी लोकांना खुश करण्यासाठी ते सांकेतिक प्रदर्शन व असले टास्क देऊ शकतात ,परंतु ते आमच्या सोबत युद्ध लढू शकत नाहीत*
*याचे तंतोतंत पालन*
*आदर्श शिक्षक या नात्याने आपले* *मोदीजी करतात*
*मन की बात*
मध्ये चुकून ही ते चीनचे नाव सुद्धा येऊ देत नाहीत ,,त्याला नाव घेऊन इशारा ही देत नाहीत
*आपल्या मौल्यवान मार्गदर्शनात ते इको फ्रेंडली गणेशोत्सव यावर बोलतात*
*80 कोटी*
*गरीब जनतेला 5 महिने प्रति व्यक्ती*
*5किलो*
*गहू किंवा तांदूळ देण्याची ते घोषणा करतात*
याने जग चकित झाले आहे असे ते सांगतात ,,
*मोदीजी जग खरोखरच आच्छर्य चकित झालेलं आहेच*
यात आम्हांला तरी संदेह नाही
जो चीन क्रूर पणे रणगाडे चालवतो त्या सरकारच्या विरोधात ही लोक रस्त्यावर उतरतात ,व रणगाड्या खाली स्वतः ला चिरडून घेतात
,व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने सैनिक उतरवले म्हणून अमेरिकन लोक रस्त्यावर उतरतात ,
जगात लोक उद्रेक करतात ,सरकारच्या धोरणांना प्रश्न विचारतात,
भारतात हे घडत नाही व या पुढे ही घडेल अशी श्यक्यता ही नाही
मी कॉलेज जीवनात असताना अश्याच क्रांतीची स्वप्ने बघायचो ,
लॉ कॉलेजला ऍडमिशन साठी वयाचे बंधन नसल्यामुळे , नार्थकोट प्रशालेतील शिक्षक *रु ल येडके*
हे ही आमच्या समवेत शिकत होते ,
ते मला अनुभवी सल्ला दयायचे
*अविनाश ह्या क्राती चे वेड डोक्यातून काढून टाक*
*मुघलांची 700 वर्ष*
*व ब्रिटिशांची 150 वर्ष लाथा खाऊन आपण घडलेले आहोत*
*पण हे वेड संपले नाही*
*आता बायको ही म्हणते संसार कधी केला नाही*
*आणि लिखाण तुमच्याने सोडवत नाही*
*माझ्या अनेक मित्राना हा उपद्व्याप वाटतो*
*पण राजा नागडा आहे हे मला ओरडून जगाला सांगावे वाटते*
*आदत से मजबूर*
अशी माझी अवस्था आहे
*बालवाडीत माझे मन रमत नाही ,यास मी काय करू?*
तूर्त इतकेच,,,,!
जय हिंद,,,,,,!
****************
ऍड अविनाश टी काले अकलूज
ता माळशिरस
जिल्हा सोलापूर
9960178213