Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोवीड१९ चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता धार्मिक सामाजिक कार्यक्रम घेऊ नयेत लग्न समारंभ दोन कुंटूबाच्या मार्यादेतच घ्यावेत बकरी ईद साधेपणाने वैयक्तिक आंतर पाळून साजरी करावी

कोवीड१९ चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता


धार्मिक सामाजिक कार्यक्रम घेऊ नयेत


लग्न समारंभ दोन कुंटूबाच्या मार्यादेतच घ्यावेत


बकरी ईद साधेपणाने वैयक्तिक आंतर पाळून साजरी करावी


पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे कडून आवाहन


 लातूर प्रतिनिधी : (सोमवार २० जूलै)


    कोवीड१९ चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता लातूर जिल्हयातील जनतेने गर्दी जमा होणारे कोणतेही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेऊ नयेत, लग्न समारंभही दोन कुंटूबाच्या मर्यादेत करावा, येऊ घातलेली बकरी ईद सुरंक्षित आंतर पाळत साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.


   या संदर्भाने पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोवीड१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्यात आणि देशभरात सर्व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी जमा होणारे कोणतेही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेता येणार नाहीत. लग्न समारंभही दोन कुंटूबाच्या मर्यादेतच घेणे अपेक्षित आहे. काही दिवयसापुर्वी लॉकडाऊनमधे थोडी फार शिथीलता देण्यात आली होती. मात्र आता या सर्व शिथीलता रदद करण्यात आल्य आहेत. त्यामुळे गर्दी जमवुन संसर्ग होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे २० पेक्षा अधिक लोक जमवुन कोणताही धार्मिक कार्यक्रम किंवा सामाजिक कार्यक्रम आयेाजित करता येणार नाही. पाच पेक्षा अधिक लोकांना सार्वजणीक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी आहे.


   या अनुषंगाने शनीवार दि. १ ऑगस्ट २० रोजी येणारी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असे आावाहन यांनी केले आहे. बकरी ईद निमीत्त होणारी नमाज मुस्लीम बांधवानी मश्जिद अथवा ईदगा मैदान अशा सार्वजनीक ठीकाणी अदा न करता नागरीकांनी आपआपल्या घरीच अदा करणे गरजेचे आहे. सदय परिस्थीतीत जनावराचे बाजार बंद असल्यामुळे या संदर्भानने शक्यतो खरेदी विक्री ऑनलाईन पध्दतीने करावी, प्रतीकात्मक कुर्बानी देणे अधिक संयुक्तीक ठरणार आहे. रमजान ईदच्या वेळीही मुस्लीम बांधवानी योग्य भुमीका घेत घरीच नमाज अदा केली होती. बाजारात व इतर ठीकाणी कोणतीही गर्दी न करता हा सण साजरा झाला होता. यावेळीही बकरी ईद साध्या पध्दीने साजरी होईल हा विश्वास आहे असे सांगून कोवीड१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले निर्बध कायम असुन त्यात बकरी ईदनिमीत्त कोणतीही शिथीलता देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले असल्यमुळे नागरीकांनी साथीच्या रोगापासून आपले संरक्षण करणेसाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी या प्रसिध्दी पत्रकावदारे केले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post