Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मातोऴा येथिल आत्महत्या प्रकरण..औसा पोलीस प्रशाशनाचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष.. पोलिस अधीक्षक या गंभीर घटनेकडे लक्ष देणार का? काही आरोपी आजून मोकाटच! आरोपीकडून दिली जाते धमकी!

मातोऴा येथिल आत्महत्या प्रकरण..


औसा पोलीस प्रशाशनाचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष..


 पोलिस अधीक्षक या गंभीर घटनेकडे लक्ष देणार का?  


काही आरोपी आजून मोकाटच!
आरोपीकडून दिली जाते धमकी!



लातूर -औसा तालुक्यातील मातोळा येथे दिनांक 10 मे 2020रोजी बाबुराव निवृत्ती राजे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी सुसाईड नोट मधील आरोपीवर कारवाई होत नसल्याने सदर प्रकरण सीआयडीमार्फत करण्यात यावा अशी मागणी सुरज राजे यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक 17/ 7 /2020 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.
  मातोळा तालुका औसा येथे बाबुराव निवृत्ती राजे यांनी 10 मे रोजी भोसले यांच्या शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपवले सदर घटने च्या वेळी मयताच्या खिशात सुसाइड नोट होती. त्यामध्ये आपल्याला सतत शेती करता दबावतंत्र वापरून स्वतःला व कुटुंबियाला  सतत त्रास दिला जात आहे, या त्रासाच्या भीतीपोटी जीवन संपवित  आहे.अशा आशीयाचा मजकूर  व काहींची नावे या नोट मध्ये होती.सुसाईड नोट व एफ आय आर मध्ये जेवढी नावे आहेत त्यातील काही व्यक्तींना पोलिसांनी अटकही केली परंतु काहींना अटक न करता त्यांना मोकळे सोडले, सदर आरोपी गावात बिनबोबाट फिरत कसल्याचे निदर्शनास येत आहे .ज्यांना पोलिसांनी अटक केली होती ते जामिनावर सुटून गावात आल्यावर पुन्हा धमक्या देत आहेत केस मागे घे नाहीतर तुझ्यावर खोटे केस करून आत मध्ये टाकू असे धमकावने सुरूच असून  सदरील व्यक्तीच्या हस्ते परहस्ते जीवितास धोका असून आमच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे ,असे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. एकंदरीतच औसा पोलीस प्रशासन आरोपीस अभय मिळत असल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे आता पोलिस अधीक्षक असं सर्वसामान्य कडून विचारला जाऊ लागला आहे
"सध्या कोरोनाचे गंभीर संकट आपणासर्वांवर आहे याचा तान पोलिस प्रशाशनावर जास्त येत आहे, यात काही शंका नाही ,परंतू मातोळा येथील वडिलाच्या आत्महत्या प्रकरणात त्याच्या मुलावर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.एकिकडे कोरोनावायरस  सारखा गंभीर आजार तर दुसरिकडे जामीन मिळालेल्या आरोपीकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत,परंतू आशा या आवस्थेत नेमके काय करावे?कुठे जावे?अशाप्रकारचा प्रश्न पडला आहे,त्यामूळे या गंभीर प्रकरणाकडे पोलिस अधिक्षक लक्ष देणार का?असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून विचारला जावू लागला आहे."  


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post