Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

FD पेक्षा जास्त नफा देणारी सरकारची नवी योजना पहा

FD पेक्षा जास्त नफा देणारी सरकारची नवी योजना 



01 जुलै 2020 पासून केंद्र सरकारची (Government of India) फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड 2020 (टॅक्‍सेबल) ही योजना गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे


 1 जुलैपासून केंद्र सरकारने(Government of India) फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड 2020 (टॅक्‍सेबल) ही गुंतवणूक योजना सुरु केली आहे. यामध्ये पैसे गुंतविणाऱ्यांना थोडाथोडका नव्हे तर 7.15 टक्के व्याज दर देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेणार आहे. यानुसार व्याजदर बदलण्यात येणार आहेत. 



जुलै महिन्यापासून योजना सुरु झाली म्हणजे पुढील व्याजदरातील बदल हा 1 जानेवारी 2021 मध्ये करण्यात येणार आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास त्याचे व्याज दर महिन्याला न मिळता दर सहा महिन्याला दिले जाणार आहे. हे बाँड्स आरबीआय बाँडच्या बदल्यात लाँच करण्यात आले आहेत. आरबीआय बाँड सरकारने मागे घेतले होते. त्याचे व्याजदर 7.75 टक्के होते. हे व्याजदर बाँडच्या पूर्ण कालावधीसाठी लागू राहणार आहेत. 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post